महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिखलदऱ्याला पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी - राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा प्रसार

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मात्र पर्यटकांना चिखलदरामध्ये नो एंट्री असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातही शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने हे बंद राहणार आहे. त्यामुळे चिखलदरा येथील पर्यटन देखील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे आहे.

Breaking News

By

Published : Jul 2, 2021, 8:14 PM IST

अमरावती -सध्या राज्यात डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध असले तरी पूर्वीच्या निर्बंधापेक्षा नियमांत मोठी सूट असल्याने राज्यभरातील पर्यटन केंद्रावर दररोज मोठी गर्दी राहते. विदर्भातील काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे सुद्धा पर्यटकांच्या गर्दी फुलुन गेले आहे. मागिल आठवड्यातील शनिवार आणि रविवारी जवळपास १० हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी चिखलदरामध्ये हजेरी लावली होती. परंतु आता उद्या शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मात्र पर्यटकांना चिखलदरामध्ये नो एंट्री असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातही शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने हे बंद राहणार आहे. त्यामुळे चिखलदरा येथील पर्यटन देखील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे आहे.

चिखलदऱ्याला पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी

'शनिवार, रविवार चिखदऱ्यात पर्यटकांना नो एंट्री'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू आहे. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे चिखलदरासह राज्यातील अनेक पर्यटनस्थळ हे पर्यटक भेट देत आहे. लॉकडाऊननंतर चिखलदरामध्ये दररोज हजारो पर्यटक भेटी देऊन निसर्गाच्या मनमोहक सृष्टीचा आनंद लुटत आहे. त्यातच शनिवार आणि रविवारी ही संख्या मोठी असते. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी दोन दिवस येथील पर्यटन पूर्णतः बंद राहणार असून पर्यटकांना नो एंट्री असणार असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार श्रीमती माने यांनी दिली.

हेही वाचा -'उरी'ची अभिनेत्री 'ईडी'च्या रडारवर, यामी गौतमची ७ जुलैला होणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details