अमरावती : ऐन जेवण करण्याचे वेळेतच पती-पत्नीत ( Deceased Wife Ritika Satish Kalbande ) घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. त्यात राग अनावर झाल्याने पतीने-पत्नीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना चांदूरबाजार येथील तहसील कार्यालयाचे मागील महात्मा फुले काॅलनीत ( Mahatma Phule Colony ) शुक्रवारी घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीनेसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ( Chandurbazar Police ) तत्काळ हालचाल करून त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
आरोपी पती उपाचारासाठी रुग्णालयात दाखल :ऋतीका सतीश उर्फ किशोर काळबांडे ( Deceased Wife Ritika Kishore Kalbande ) ४५ असे मृतक पत्नीचे नाव असून, सतीश उर्फ किशोर मधुकर काळबांडे ५० असे आरोपी पतीचे ( Satish alias Kishore Madhukar Kalbande ) नाव आहे. चांदूरबाजार पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सतीशवर भादंवि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली. या घटनेत पतीनेही स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी घटनास्थळ गाठून आरोपी पतीचा जीव वाचविला. त्याला अमरावती रिम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मृत महिला होती शिक्षिका :मृतक ऋतीका व सतीश हे पती, पत्नी आपल्या १५ वर्षीय मुलगा क्षितीजसोबत चांदूरबाजार येथील महात्मा फुले काॅलनीत तीन महिन्यांपूर्वीच डाॅ. किरण संजयराव भाविक यांचे घरी भाड्याने राहत होते. सन २००४ मध्ये ऋतीकाचे लग्न सतीश सोबत झाले. तेव्हापासून ऋतीकाने काकडा येथे ४ वर्षे, आष्टीच्या शाळेवर ४ वर्षे, अमरावतीला दोन वर्ष, पोटे विद्यालयात ३ वर्ष, हर्षराज काॅलनी येथील अरुणोदय शाळेत २ वर्षे, वाशीम येथील शाळेत अडीच वर्षे शिक्षिकेची नोकरी केली. गेल्या तीन महिन्यांपासून ती चांदूरबाजार येथील होलीपेथ काॅन्व्हेटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिचा मुलगा क्षितीज १५ हा जगदंब पब्लिक स्कूलमध्ये १० वीत शिकत आहे.