महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Honey Village in Melghat : मेळघाटात साकारल्या जातेय ‘मधाचे गाव’; जाणून घ्या काय आहे संकल्पना

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत ( Honey village developing in Melghat ) आहे. त्याअनुषंगाने श्रीमती सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या गावातून परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी आज व्यक्त केला. ( Honey Village in Melghat )

Honey Village in Melghat
अमरावती मधाचे गाव आमझरी

By

Published : Aug 4, 2022, 11:02 AM IST

अमरावती - चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित ( Honey Village in Melghat ) होण्यासाठी या योजनेची सर्व विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी आज व्यक्त केला.

अनेक जणांची उपस्थिती -राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्रीमती सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावन कुमार, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिपना महाविद्यालयातील मधुमक्षिका पालन विभागप्रमुख आदी अनेकजण उपस्थित होते.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांची बैठक

मधाचे गाव म्हणून विकसित होणार - सिन्हा म्हणाल्या की, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, ग्रामीण भागातील युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मधाचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने संकलन व त्यानुषंगाने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

हेही वाचा -Rahul Gandhi taunts BJP RSS: हर घर तिरंगा मोहिमेवरुन राहुल गांधींनी भाजपसह आरएसएसची उडवली खिल्ली

मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास - मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्व मोठे आहे. त्याचा पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठीही लाभ होतो. हे लक्षात घेता मधमाश्यांच्या संवर्धनाबाबत उपक्रम आखण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल व मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास होईल. मध केंद्र योजनेत मधमाशीपालनासाठी प्रशिक्षण, साहित्यवाटप, अनुदान आदी सुविधा मिळतात. त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण - सिन्हा यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना उपक्रमाची माहिती दिली. यावेळी स्थानिकांना आग्या मधमाश्यांचे कीटवाटप करण्यात आले. खादी व ग्रामोद्योग आयोग व वन विभागामार्फत आमझरी येथील महिलांना नुकतेच अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा -गायक किशोर कुमार यांची आज 93 वी जयंती; चाहत्यांनी मंदिर, संग्रहालय बनवून आठवणींना ठेवलंय जीवंत

ABOUT THE AUTHOR

...view details