अमरावती -अयोध्येतील राम जन्मभूमी विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज शनिवारी निकाल जाहीर झाला. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देशभरात हाय अलर्ट देण्यात आला होता. अमरावती जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सोशल मीडियावर देखील पोलिसांचे लक्ष आहे, व्हॉट्सअॅप ग्रुप अडमिनला पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.
'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट
अमरावती जिल्हात पोलिसांचा तगडा बंदोबस्त... सोशल मीडियावर देखील पोलिसांचे लक्ष.. व्हॉट्सअॅप ग्रुप अडमिनला पोलिसांनी नोटिसा दिल्या..
!['अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5010118-thumbnail-3x2-aa.jpg)
'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट
'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट
हेही वाचा... अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ टाकू नये व ते शेयर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर व्हाट्सपला ग्रुप फक्त अॅडमीन कंट्रोल करेल त्यासाठी व्हॉट्स अॅपवर सेटींगमध्ये बदल करावा असे, पोलिसांनी सांगितले आहे. जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.