महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा - अमरावतीत मुसळधार पाऊस

अमरावती शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अमरावतीत मुसळधार पावसाला सुरूवात

By

Published : Sep 5, 2019, 5:43 PM IST

अमरावती - आज दुपारपासून शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अमरावतीत मुसळधार पावसाला सुरूवात

गेल्या काही दिवसांपासून शहरात रिमझिम पाऊस चालू होता. मात्र, आज ४ वाजल्मुयापासून सळधार पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. 14 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत पावसाने उसंत घेतली होती. 1 सप्टेंबरपासून अमरावती शहरात अधूनमधून रिमझिम पाऊस कोसळत होता. मात्र, आज शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. अमरावती सोबतच मेळघाटातही जोरदार पाऊस कोसळतो आहे. अमरावती शहरातील छ्त्री आणि वडाळी तलाव अद्याप भरलेला नसून सुरु असणाऱ्या पावसामुळे दोन्ही तलाव भरण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details