महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Heavy rainfall in Amravati : अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, गावांमध्ये पाणी शिरले - विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

अमरावती जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याचे चित्र ( rainfall in Amravati district with Lightning struck ) आहे. शनिवार, रविवार आणि आज सकाळी पासूनच पावसानं दमदार हजेरी लावली ( Heavy rainfall in Amravati ) आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पुढे ढगफुटी सुदृश्य पाऊस पडल्याने काही गावांमध्ये पाणी शिरल्याची माहिती प्राप्त झाली ( rainfall in Amravati ) आहे.

Heavy rainfall in Amravati
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By

Published : Sep 12, 2022, 2:30 PM IST

अमरावती: गेले काही दिवस पावसाने थोडी उसंत दिली होती.परंतु आता पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यात पावसाने थैमानघातल्याचे चित्र ( rainfall in Amravati district with Lightning struck ) आहे. शनिवार, रविवार आणि आज सकाळी पासूनच पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पुढे ढगफुटी सुदृश्य पाऊस पडल्याने काही गावांमध्ये पाणी शिरल्याची माहिती प्राप्त झाली ( rainfall in Amravati ) आहे.

जिल्ह्यात चांदुर रेल्वे येथे जोरदार पावसाने आठवडी बाजार परिसरात नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात टाकरखेडा शंभू अचलपूर तालुक्यातही पाऊस जोरदार कोसळला असून त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. चांदूरबाजार तालुक्यात मुसळधार पावसाची ( Heavy rainfall ) नोंद झाली असून शिरसगाव कसबा परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. दर्यापूर येवला परिसरात विजेच्या कडकडे सह पावसाने जोरदार एंट्री ( rainfall with Lightning struck ) मारली.


तीन गावांमध्ये शिरले पाणीधामणगाव रेल्वे तालुक्यात ८ गावांमध्ये ९० मिलिमीटर पेक्षा अधिक ढगफुटी सुदृश्य पाऊस कोसळला. काही घरांची पडझड झाली तर तीन गावांमध्ये पावसांचे पाणी शिरले असल्याची माहिती आहे. वीरूळ रोंगे, वाघोली गुंजी या गावांचा यात समावेश आहे. विदर्भ, मोती, कोळसा, वर्धा नद्या फुगल्याने तालुक्यातील अनेक मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.



गणेश भक्तांनी लुटला पावसाचा आनंदशनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी गणपती विसर्जन असल्याकारणाने रस्त्यावर गणपती विसर्जनाच्या मिरवणूकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शहरातील रस्त्यांवर मिरवणुकीच्या रांगा लागल्या होत्या. अशातच पावसाने दमदार बॅटिंग केल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसत होते. ( Heavy rainfall in Amravati )

ABOUT THE AUTHOR

...view details