अमरावती- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमरावती शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नवीन वर्षाच्या सकाळीच अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
मुसळधार पावसाने उजाडली अमरावतीकरांची नवीन वर्षाची सकाळ - अमरावती रेन न्यूज
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमरावती शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने उजाडलेल्या नवीन वर्षाच्या सकाळीच अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
हेही वाचा -अमरावतीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कडाक्याच्या थंडीने कहर केला असतानाच मंगळवारपासून अवकाळी पाऊस बरसायला लागला आहे. मंगळवारी रात्री ढगाळ वातावरण असले तरी पाऊस कोसळला नाही. आज (बुधवार) पहाटे मात्र आकाशात काळे ढग दाटून आले आणि पहाटे पावसाच्या रिमझिम सरी पडल्या. त्यानंतर सकाळी मात्र दमदार पावसाला सुरुवात झाली. अमरावती शहर आणि जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीची लाट असताना पावसामुळे थंडीची लाट आणखी काही दिवस अमरावतीकरांना सोसावी लागणार आहे.