अमरावती -विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यातही धो-धो पाऊस बरसला आहे. रविवारी ( 19 जून ) पहाटे झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या शिरजगाव कसबा गावात पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ ( heavy rain in amravati district ) उडाली.
नागरिकांच्या घरात पाणी -पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शिरजगाव कसबा या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. गावातील रस्त्यांवर नदी सारखे पाणी वाहत होते. गावालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला असून, अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शिरजगाव कसबा गावात खळबळ उडाली आहे.