महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amaravati Rain Update : विदर्भाच्या 'या' जिल्ह्यात पावसाचा मुक्काम; बळीराजा चिंतेत - बळीराजा चिंतेत

अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस ( Heavy rain in Amravati district ) कोसळत आहे. आता पावसाचा मुक्काम आणखी एक आठवडाभराने वाढल्याची माहिती ( Rainfall extented for week) हवामान खात्याकडून मिळाली आहे.

Amaravati
अमरावती

By

Published : Sep 19, 2022, 5:48 PM IST

अमरावती :जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघुस्वरूपाचे पाणी प्रकल्प पूर्णतः भरलेले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे असणाऱ्या अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा या धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशातच या पावसाने मुक्काम वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले ( anxiety spread among the farmers ) आहे. आता पावसाचा मुक्काम आणखी एक आठवडाभराने वाढल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे.

हवामान तज्ञांची माहिती :वायव्य भारतात प्रतिचक्राकार वारे निर्माण झाल्यामुळे पंजाब, हरियाणामधून लवकरच मान्सूनला परतीसाठी वातावरण अनुकूल आहे. उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. याच्या प्रभावामुळे २० तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे २५ सप्टेंबर पर्यंत विदर्भासह अमरावती जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे माहिती अमरावती शहरातील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी प्रसारमाध्यमाला दिली आहे. 25 सप्टेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला असल्याचीही माहिती अमरावती शहरातील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details