अमरावती :अमरावती शहरात आज मुसळधार पाऊस कोसळतो ( Heavy Rain in Amravati ) आहे. आज सुरू असलेल्या पावसामुळे अमरावती शहरातील वडाळी तलाव या वर्षी पहिल्यांदाच तुडुंब भरून ओव्हरफ्लो ( Lake Overflows in Wadali ) झाला आहे. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी अतिशय जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे अमरावतीकरांची तारांबळ ( Amravatikar Star was Blown ) उडाली आहे.
नाल्याकाठी राहणाऱ्यांना धोक्याचा इशाराअमरावती शहरात आज मुसळधार पाऊस कोसळत असून, वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आंबा नाल्याला पूर येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना महापालिका प्रशासनाच्या वतीने धोक्याचा इशारा देण्यात आला असून, कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला आहे. वडाळी तलावासह शहरातील छत्री तलावदेखील ओव्हरफ्लो झाला असून, या दोन्ही तलावांतील पाणी शहरातील सर्व परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांमधून अंबा नाल्यात येत असल्यामुळे आंबापेठ नमुना परिसर अंबादेवी मंदिर परिसर या भागातून वाहणाऱ्या आंबा नाल्याला आज पूर येण्याची शक्यता आहे.