अमरावतीहृदयविकाराचा झटका आल्यामुळे हृदयाच्या पडद्याला छिद्र पडले अशा अवस्थेत रुग्ण महिलेला योग्य उपचारासाठी अमरावतीतून थेट नागपूरला पाठवणे गरजेचे होते मात्र आम्हाला नागपूरला जायचे नाही तुमच्याकडे उपचार घ्यायचा आहे अशी ठाम भूमिका रुग्ण महिलेच्या Manda Haribhau Pandey नातेवाईकांनी घेतली अशा परिस्थितीत हृदयावर किचकट अशी शस्त्रक्रिया केली तर रुग्ण वाचेलच याची शाश्वती नसताना डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले शस्त्रक्रिया केल्यावर आठ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण महिला रुग्णालयातच दाखल होती आठ दिवसांनंतर रुग्ण महिला हसत खेळत घरी जाण्याच्या तयारीत असल्याचे पाहून तिला जीवनदान मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्याही जीवात जीव आला अमरावती शहरात हृदयाची Axon Private Hospital in Amravati अशी किचकट शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वी झालेल्या डॉक्टरांचा आनंद गगनाला भिडणारा आहे
हृदयविकाराचा झटका आला आणि सुरू झाली धावपळअमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असणाऱ्या शिरजगाव बंड Shirajgaon Bund या गावातील रहिवासी असणाऱ्या मंदा हरिभाऊ पांडे Manda Haribhau Pandey या साठ वर्षीय महिलेला दहा दिवसांपूर्वी अचानक अस्वस्थ वाटायला लागले अंगावर मुंग्या आल्या असाव्यात असा भास व्हायला लागला त्यांना तत्काळ चांदूरबाजार येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून रुग्ण महिलेला अमरावतीला हलविण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला यानंतर वेळ वाया न जाऊ देता पांडे कुटुंबीयांनी मंदा पांडे यांना अमरावती शहरातील अॅक्झॉन या खासगी Axon Private Hospital in Amravati रुग्णालयात आणले
हृदयविकाराचा तीव्र झटका या ठिकाणी डॉ सुधीर धांडे यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्यांना नागपूरला जाण्याचा सल्ला दिला मात्र पांडे कुटुंबीयांनी आता कुठलीही धावपळ न करता तुम्हीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे अशी भूमिका घेतली आणि यानंतर डॉक्टरांनी अतिशय किचकट असणारी ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच अमरावतीत करण्याची तयारी दर्शवली
डॉक्टरांसमोर असे होते आव्हानडॉक्टरांनी मंदा पांडे ह्या रुग्ण महिलेची तपासणी केली असता हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदयाच्या दोन कप्प्यांमध्ये असणाऱ्या पडद्याला छिद्र पडल्याचे आढळून आले या परिस्थितीत रुग्णाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली तर तो रुग्ण एक-दोन दिवसांच्या वर वाचेल याची शाश्वतीच नसते तसेच या रुग्णाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली नाही तर तो महिनाभरात दगावतो अशीच परिस्थिती असते यामुळे आमच्यासाठी मंदा पांडे या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान होते असे डॉ सुधीर धांडे ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले