अमरावती - खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे शनिवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार आहेत. यासाठी ते शुक्रवारी पहाटे मुंबईत पोहोचले आहेत. अशातच अमरावतीत त्यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (Police Security at Yuva Swabhiman Party Office Amravati) लावण्यात आला आहे. या पार्टी कार्यालय परिसरात काही शिवसैनिक आले होते. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे त्यांना परतावे लागले.
Police Security : रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त - राणा दाम्पत्य उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण
खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे शनिवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार आहेत. यासाठी ते शुक्रवारी पहाटे मुंबईत पोहोचले आहेत. अशातच अमरावतीत त्यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (Police Security at Yuva Swabhiman Party Office Amravati) लावण्यात आला आहे.
कार्यालयासमोर जमले होते शिवसैनिक -शहरातील राजापेठ परिसरात स्थिती युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी काही शिवसैनिक राजापेठ परिसरात एकत्र आले होते. याबाबतची माहिती मिळताच राजापेठ पोलीस अलर्ट झाले. अवघ्या काही वेळातच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.
पोलीस बंदोबस्तामुळे शिवसैनिक परतले -आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी जमलेले शिवसैनिक कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहून परतले. आमदार रवी राणा हे शुक्रवारी रात्री आठ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावरून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला जाणार होते. मात्र, शुक्रवारी पहाटेच ते नागपूरवरून मुंबईला रवाना झाले. आमदार रवी राणा यांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येऊ देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. मात्र, गुरुवारी रात्री आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या अमरावतीतून निघून नागपूर मार्गे थेट मुंबईला पोहोचले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांची निराशा झाली.