अमरावती - कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या अनेक बंदीस्त कैद्यामध्ये वेगवेगळ्या कला, कौशल्य असतात. या कलेच्या माध्यमातून कारागृहातील कैदी विविध कामे करतात. अशाचप्रकारे अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांनी हस्तकलेच्या माध्यमातून विविध आकर्षक व देखण्या वस्तू तयार केल्या आहे. या वस्तू विक्रीच्या माध्यमातून त्यांना फायदा देखील होणार आहे. वस्तू विक्री करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पन्नास लाख रुपयांचा निधी देऊन विक्रीसाठी एक मॉल उभारण्यात आला आहे. असे मॉल उभारणारे अमरावती कारागृह राज्यातील पाहिले कारागृह आहे. कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. दरम्यान या मॉलचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
'हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल'