महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणूक निकाल; तिवसा तालुक्यात काँग्रेस तर चांदूर रेल्वे तालुक्यात भाजपने मारली बाजी

तिवसा तालुक्यात सध्या भाजप बळकट होण्याचा प्रयत्न करीत असताना, घोटा, कव्हडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. भाजपला जोरदार धक्का बसला असून, या तिन्ही ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच निवडून आल्याने माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व कायम ( BJP Won in Gram panchayat at Chandur Taluka ) राखले ( Yashomati Thakur has Maintained his Supremacy ) आहे.

Gram Panchayat Election Results
ग्राममपंचायत निवडणूक निकाल

By

Published : Sep 19, 2022, 2:27 PM IST

Updated : Sep 19, 2022, 2:53 PM IST

अमरावती :जिल्ह्यात एकूण पाच ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत असून, तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचातीत काँग्रेसने बाजी ( Gram Panchayat Election Won Congress in Tivasa Taluka ) मारली. तर चांदूर तालुक्यात चांदूरवाडी येथे भाजपने बाजी ( BJP Won in Gram panchayat at Chandur Taluka ) मारली. धारणी तालुक्यात हरिसल येथे युवकांनी ग्रामपंचायत जिंकली असून, अमरावती तालुक्यात रोहणखेडा आणि आखतखेडा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली ( Former Minister Yashomati Thakur has Maintained his Supremacy ) आहे.


तिवसामध्ये यशोमती ठाकुरांचे वर्चस्व कायम :तिवसा तालुक्यात सध्या भाजप बळकट होण्याचा प्रयत्न करीत असताना, घोटा, कव्हडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. भाजपला जोरदार धक्का बसला असून, या तिन्ही ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच निवडून आल्याने माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. यशोमती ठाकूर यांचा खास कार्यकर्ता रितेश पांडव मात्र उंबरखेड गरमपंचातीत पराभूत झाले आहे.


चांदूरवाडीत भाजपचा झेंडा :चांदूर रेल्वे तालुक्यात चांदूरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या वर्षा सुधाकर माताडे या 303 मतांनी विजयी झाल्या. चांदूरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, आमदार प्रताप अडसड यांनी काँग्रेसला जबर फटका देत चांदूरवाडी गरमपंचातीवर भाजपचा झेंडा फडकवला.


हरिसलमध्ये युवकांच्या हाती धुरा :मेळघाटात धारणी तालुक्यात येणाऱ्या हरिसल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी धारणी तहसील कार्यालयात झाली. विजय धारसिंगे हा अवघा 24 वर्षांचा युवक सरपंच म्हणून निवडणून आला. निवडून आलेलले इतर सदस्यदेखील तरुणच आहेत.

Last Updated : Sep 19, 2022, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details