अमरावती :जिल्ह्यातील (Amravati District) तिवसा, चांदूरबाजार, मोर्शी या तालुक्यातील शेत जमिनीतून चक्क पाणी झिरपायला (governments plans are on hold) लागले आहे. शेतात आणि शेतीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे (flooded roads are still not ready to go to Farms) शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.Farmers Problems
प्रतिक्रिया देतांना शेतकरी व कृषी तज्ञ
शेतमाल शेतातच पडून :तिवसा तालुक्यात येणाऱ्या डवरगाव आणि लगतच्या परिसरात जमीन मोठ्या प्रमाणात झिरपत असल्यामुळे शेतमाल खराब होण्याची भीती आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन कापून ठेवले आहे. ते सोयाबीन शेतातून बाहेर न्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेत जमिनीतून झिरपणारे पाणी गावातून शेताकडे जाणाऱ्या वाटेवर वाहत असल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर गाळ साचला आहे. विशेष म्हणजे शेतीला जायला रस्ताच नसल्यामुळे, मजूर देखील या भागातील शेतात काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहे.
पाणंद रस्त्यांचा पत्ता नाही : ग्रामीण भागात समृद्धी नांदावी यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यापैकी पाणंद कच्चा रस्ता मजबुती करण्याच्या कामासंदर्भात 27 फेब्रुवारी 2018 ला शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे अमरावती जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची कामे व्हायला हवी होती. मात्र डवरगाव आणि लगतच्या भागात पाणंद रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाच्या वतीने गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्यामुळे, शेकडो शेतकऱ्यांना आजही त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नाही. जो काही कच्चा मार्ग आहे, त्या मार्गावर सध्या जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे गाळ साचल्याने या मार्गावरून चालणे देखील जीव घेणे ठरत आहे. असे असताना ग्रामीण भागाचा आणि शेतीचा विकास करणारे शासनाचे धोरण कुठे हरपले, असा प्रश्न डवरगाव येथील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना उपस्थित केला.
शासनाने लक्ष देण्याची मागणी : शेतजमीन चक्क झिरपायला लागल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या तोंडावर आमचे हाती आलेले पीक वाया जाणार. शेतात साचलेले पाणी आणि शेतीकडे येणाऱ्या रस्त्यावर कमरेपर्यंत गाळ साचला असल्यामुळे व्यापारी आमच्या शेतातील संत्रा खरेदी करण्यास देखील येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत आम्ही नेमके काय करावे. आता शासनाने आमच्या गंभीर समस्येची त्वरित दखल घ्यावी आणि भविष्यात आमच्यावर असे संकट येणार नाही, यासाठी पाणंद रस्ते बांधणीसह इतर सर्व महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी देखील दवरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना केली आहे.
या कारणामुळे झिरपत आहे शेतजमीन :गेल्या आठवडाभरापासून ढवरळगाव, यावली तसेच अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून त्यामुळे जमिनीतील पाणी साठवण्याची क्षमता नष्ट झाली आहे. या भागातील जमिनी उथळ असल्यामुळे तसेच खाली काळा दगड असल्यामुळे जमीन पूर्ण पाण्याने भरलेली असून जमिनीच्या आतील जे पाण्याचे स्त्रोत असतात ते पूर्णपणे भरलेले आहे . त्यामुळे उंचावरच्या शेतातून खाली असलेल्या शेताकडे जमिनीचे आतमधून पाणी वाहत आहे. ज्या ठिकाणी जागा मिळते त्या ठिकाणी पाणी शेतातून जिवंत झऱ्याच्या स्वरूपात बाहेर पडत असून ते जवळपासच्या नाल्यामार्फत नदीकडे जात असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषी आणि हवामान तज्ञ प्रा. अनिल बंडे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली. हळूहळू जास्तीचे साठवलेले पाणी निघून जाईल आणि चार-पाच दिवसानंतर पाणी झिरपणे बंद होईल असा अंदाजही प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केला.Farmers Problems