महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati violence - सरकारला 'त्या' घटनेचा हिशोब द्यावा लागेल - किरीट सोमैया - अमरावती दगडफेकीची घटना

त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यातील तीन शहरांमध्ये मोर्चा निघतो. ह्या मोर्चादरम्यान दगडफेक आणि हिंसाचार घडतो. यामध्ये भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, जे काही घडले त्याचा हिशेबही सरकारला द्यावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिली आहे. ते अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद
किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद

By

Published : Dec 1, 2021, 7:22 AM IST

अमरावती - त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यातील तीन शहरांमध्ये मोर्चा निघतो. ( Amravati Violence ) ह्या मोर्चादरम्यान दगडफेक आणि हिंसाचार घडतो. या घटनेच्या निषेधार्थ जी काही प्रतिक्रिया उमटली त्यासाठी भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, जे काही घडले त्याचा हिशेबही सरकारला द्यावा लागणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांनी दिली आहे. ते अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषद
1992-93 च्या दंगली चे डिझाईन( Amravati Violence )

1992-93 च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) हे स्वतः मैदानात उतरले होते. आज मात्र एका हातात काँग्रेसचा आणि दुसऱ्या हातात राष्ट्रवादीचा असे दोन्ही हातात दोन हिरवे झेंडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी धरले असल्याची टीकाही सोमैया यांनी केली आहे.

डिसेंबर 30 डिसेंबर पर्यंत 40 भ्रष्टाचाराची पोल-खोल

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अनेक मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत. कॅबिनेट मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. सध्या या सरकारचे 28 घोटाळे माझ्याकडे असून 30 डिसेंबरपर्यंत 40 भ्रष्टाचाराची पोल-खोल मी करणार असल्याचे किरीट सोमैया म्हणाले. मी जाणार आहे. तेथे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यातील भ्रष्टाचार उघड करणार असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

हेही वाचा -Mamata Banerjee meet Aditya Thackeray : ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात झाली अर्धा तास चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details