महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 अमरावतीच्या जिराफे बंधूंनी घडविल्या गौरी गणपतींच्या सुबक मुर्ती, मूर्तींना परदेशातही मागणी - Ganesh Chaturthi

गणपती उत्सव Ganeshotsav 2022 आता अवघ्या आठ दिवसांवर आला असतांना, अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणपती उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. अमरावती शहरातील जिराफे बंधू यांनी घडविलेल्या made by Jirafe brothers of Amravati गणपतींच्या मूर्तींसह, गौरीच्या मूर्तींना इंग्लंड आणि अमेरिकेत Gauri and Ganapati idols demand in abroad देखील मोठी मागणी आहे. शहरातील गोपाल नगर परिसरात त्यांच्या कारखान्यांमध्ये वर्षभर सुबक मूर्ती Beautiful idols of Gauri Ganapati घडविण्याचे काम सुरूच असते.

Ganeshotsav 2022
Gauri and Ganapati idols

By

Published : Aug 23, 2022, 4:24 PM IST

Updated : Aug 25, 2022, 1:36 PM IST

अमरावतीगणपती उत्सव Ganeshotsav 2022 आता अवघ्या आठ दिवसांवर आला असतांना, अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणपती उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. अमरावती शहरातील जिराफे बंधू यांनी घडविलेल्या made by Jirafe brothers of Amravati गणपतींच्या मूर्तींसह, गौरीच्या मूर्तींना इंग्लंड आणि अमेरिकेत Gauri and Ganapati idols demand in abroad देखील मोठी मागणी आहे. शहरातील गोपाल नगर परिसरात त्यांच्या कारखान्यांमध्ये वर्षभर सुबक मूर्ती Beautiful idols of Gauri Ganapati घडविण्याचे काम सुरूच असते.

जिराफे बंधूंशी संवाद साधताना ईटीव्ही इंडियाचे प्रतिनिधी



असे आहे जीराफे यांच्या मूर्तींचे वैशिष्ट्यपुण्यामध्ये जे डी आर्ट अँड डिझाईनचे 1993 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर, अमरावती शहरात मूर्ती घडविण्याच्या उद्योगाला नवे रूप देणारे अतुल जिराफे हे सध्या आपल्या कुटुंबाच्या ह्या व्यवसायाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचे वडील नंदकुमार जिराफे हे अमरावती शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून सर्वांनाच परिचित आहेत. अमरावती शहरातील सर्व जुन्या गणेशोत्सव मंडळात पूर्वी नंदकुमार जिराफे यांनी घडवलेल्या मुर्त्यांचीच स्थापना व्हायची. आता मात्र जिराफे बंधूंनी मोठ्या मुर्त्या घडविणे बंद केले असून, केवळ मातीच्या मूर्ती घडवण्यावर जिराफे बंधूंचा भर आहे. माझे कलाक्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यावर मूर्ती घडविण्यासाठी एक नवी दृष्टी आमच्या व्यवसायाला लाभली. वीस वर्षांपासून अतिशय सुबक आणि सर्वांना आवडतील अशाच मूर्ती आम्ही घडवायला लागलो, असे अतुल जिराफे ईटीव्ही भारत शी बोलतांना म्हणाले. मूर्ती नेमकी कशी घडवायची याची कलाच माझ्या मध्ये असल्यामुळे, आम्हाला कामगारांवर फारसे अवलंबून रहावे लागत नाही. गणपतीच्या मूर्ती असो किंवा गौरी महालक्ष्मीच्या मूर्ती या अतिशय सुबकपणे बनतात. पाहणाऱ्यांना अतिशय सुंदर दिसतील अशाच आम्ही घडवतो, असे देखील अतुल जिराफे म्हणाले.


शाडू मातीच्या मूर्तींवरच अधिक भरपूर्वी आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवायचो. आता सहा सात वर्षांपासून आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडविणे बंद केले असून, केवळ शाडू माती द्वारे मूर्ती घडविण्याचे काम आमच्याकडे केले जाते. मोठ्या आकाराच्या मूर्ती देखील आम्ही आता घडवीत नाही. शाडू मातीच्या घरगुती गणपतीची निर्मिती आमच्याकडे केली जात असल्याचे, अतुल चिराफे यांनी सांगितले.


महाराष्ट्रभर गौरी, महालक्ष्मीला मागणीमी स्वतः महालक्ष्मी मूर्तीच्या मुखवट्यांचे मास्टरपीस तयार करीत असल्यामुळे, आमच्याकडे अतिशय सुबक आणि सुंदर दिसणाऱ्या गौरी महालक्ष्मीचे मुखवटे तयार केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्याकडे घडविण्यात येणाऱ्या गौरी महालक्ष्मीच्या मुर्त्यांना मागणी आहे. सहा महिन्यापूर्वीच गौरी महालक्ष्मीच्या मुर्त्यांची बुकिंग होत असल्यामुळे, संपूर्ण वर्षभरच आमच्याकडे गौरी महालक्ष्मीच्या मूर्ती घडविल्या जातात, अशी माहिती देखील अतुल जिराफे यांनी दिली.


पुणे आणि औरंगाबादला शाखाआमच्या पुणे आणि औरंगाबाद येथे देखील जिराफे बंधू नावाने शाखा आहेत. या ठिकाणावरून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गणपतीच्या मूर्ती पाठविल्या जातात. गणपती आणि गौरीच्या मूर्ती मात्र अमरावतीतच घडविल्या जातात आणि येथून पुढे अकोला औरंगाबाद आणि पुण्यात या मूर्ती पाठविल्या जातात.


अमेरिका आणि इंग्लंड मध्ये मूर्तींना मागणीअमेरिका आणि इंग्लंड मध्ये आमच्याकडे घडविल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींना फार मागणी आहे. गणपती सोबतच गौरी महालक्ष्मीचे मुखवटे देखील दरवर्षी अमेरिका आणि इंग्लंड मध्ये आमच्याकडून जातात. या दोन्ही देशांमध्ये मराठी कुटुंबियांची संख्या अधिक असल्यामुळे, या ठिकाणी गौरी आणि गणपती इतर देशांच्या तुलनेत मोठ्या संख्येने जातात. अमेरिका आणि इंग्लंड मध्ये मातीच्या मूर्तींचे महत्त्व प्रचंड असून, या दोन्ही देशांमध्ये आमच्याकडे घडविण्यात येणाऱ्या मातीच्या गणपतीच्या मूर्ती दरवर्षी जातात, असे अतुल जिराफे म्हणाले.


नियमित 25 कामगार घडवतात मूर्तीजिराफे यांच्या मूर्ती घडविण्याच्या कारखान्यात 25 कामगार वर्षभर नियमित मूर्ती घडविण्याचे काम करतात. गणपती उत्सवाच्या सीजन मध्ये मात्र कामगारांची संख्या 40 पर्यंत जाते. कामगारांनी घडविलेल्या मूर्ती जिराफे कुटुंबीयातील सदस्यांकडून तपासल्या जातात. मूर्तीवर कुठलाही डाग ठेवला जात नाही. कारागिराकडून एखादी मूर्ती चुकली तर, त्या मूर्तीचे काम पुन्हा नव्याने केले जाते.


मूर्ती घडवितांना राखले जाते पावित्र्यगोपाल नगर परिसरात जीराफे बंधू यांचे घर आहे. आणि याच ठिकाणी त्यांचा मूर्ती घडविण्याचा कारखाना देखील आहे. घरातील कोणीही सदस्य आंघोळ केल्याशिवाय मूर्ती घडविण्यासाठी त्या कारखान्यात जात नाहीत. हाच नियम या कारखान्यात काम करणाऱ्या कारागीरांसाठी देखील आहे. मूर्ती ज्या ठिकाणी घडविल्या जातात, त्या ठिकाणचे पावित्र्य जिराफे यांच्या कारखान्यात जपण्यात येते.



हेही वाचाGanesh Chaturthi Recipes का आवडतात गणपतीला मोदक, 5 हेल्दी मोदक रेसिपी तुम्हीही घरी ट्राय करू शकता

Last Updated : Aug 25, 2022, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details