अमरावती -अमरावती महापालिका क्षेत्रात असणाऱ्या नागरी वसाहतीतील घाण आणि कचरा कचरा डेपोत न जाता थेट शहरालगतच्या जंगल परिसरात फेकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडाळी - पोहरा जंगल (Wadali Pohari Forest Area) परिसरात मोठ्या प्रमाणात हा कचरा फेकला जात आहे. या भागातील प्राण्यांसाठी हा कचरा घातक ठरणारा असून पर्यावरणासाठी सुद्धा हे योग्य नाही. या गंभीर प्रकार जंगलात सुरू असताना वन विभागाच्या वतीने मात्र याकडे गंभीर प्रकाराकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसत आहे.
आकाशवाणी केंद्रालगतही कचऱ्याचे ढिगारे
वडाळी - पोहरा जंगलात प्रमाणेच अमरावती नागपुर एक्सप्रेस हायवे (Nagpur Express Highway) लगत आकाशवाणी केंद्राच्या भिंतीशी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगरे लागले आहेत. तपोवन , व्यंकय्या पुरा आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरा लगत हा बेकायदेशीर कचरा डेपो महापालिकेने केला असून या ठिकाणचा कचरा महामार्गावर उडत जात असल्यामुळे मार्गावरून धावणार्या वाहनांनाही त्याचा त्रास होतो आहे असा आरोप अशोक डोंगरे यांनी केला. नागरी वसाहतीत असा कचरा फेकण्यात आल्याने गाई -म्हशी या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या तसेच इतर निरुपयोगी वस्तू हात असल्यामुळे त्या आजारी पडण्याची भीती असल्याचेही अशोक डोंगरे म्हणाले. महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकारी यांचे या गंभीर समस्येकडे लक्ष नसल्याचे ही अशोक डोंगरे यांनी म्हटले आहे.
जंगलात कचरा फेकणे हा गुन्हा
कुठल्याही जंगल भागात किंवा वनपरिक्षेत्र मध्ये कचरा टाकणे योग्य नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 तसेच वनसंवर्धन अधिनियम आणि जैवविविधता संवर्धन कायद्याअंतर्गत हा गुन्हा असल्याचे पर्यावरणाशी निगडित कार्यकर्ते यादव तरटे ई टीव्ही भारतशी बोलताना म्हणाले. सामान्य नागरिक म्हणून आपण स्वतःच्या जीवाची ज्याप्रमाणे काळजी घेतो तशीच इतर जीवांनाही त्रास होऊ नये याची जबाबदारी आपलीच आहे. जंगलामध्ये तसेच इतरत्र कचरा फेकल्या मुळे पशुपक्ष्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात. या कचऱ्यावर गावठी कुत्रे आणि डुकरांची गर्दी वाढली तर याठिकाणी येण्याची भीती सुद्धा वाढते आणि यामुळे बिबट्यांचा माणसांवर हल्ला होण्याची शक्यता असून मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष होऊ शकतो. हा संपूर्ण प्रकार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनासह वेगवेगळ्या यंत्रणा आणि नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे असल्याचे यादव तरटे म्हणाले.
हेही वाचा -ओमायक्रॉन वाढत आहे, सध्या फक्त कठोर निर्बंध वाढवणार, लॉकडाऊन नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे