महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी घडवल्या ५०० गणेश मूर्ती; विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन - अमरावती कारागृह कैदी बातमी

अमरावती मध्यवर्ती कारागृहातील ८ कैद्यांनी ३ महिन्यात शाडू मातीच्या ५०० मूर्ती घडविल्या आहेत.

शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

By

Published : Aug 23, 2019, 1:54 PM IST

अमरावती -मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी शाडू मातीने घडवलेल्या गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उद्घाटन केले. तुरुंगातील ८ कैद्यांनी या मूर्ती घडवल्या आहेत.

अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल कारागृहातील गणपती मूर्ती केंद्राची पाहणी करताना

कारागृहात शिक्षा भोगत असताना ८ कैद्यांनी ३ महिन्यात शाडू मातीच्या ५०० मूर्ती घडवल्या. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती आज कारागृहाच्या वस्तू निर्मिती व विक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. यावेळी कारागृहातील मूर्ती पाहून जिल्हाधिकारी अवाक झाले. अमरावतीकरांनी कारागृहाच्या गणपती विक्री केंद्रातून गणपती मूर्ती घ्याव्या. मातीच्याच गणपतीची स्थापना करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details