अमरावती - शहरात आज एकाच दिवशी 18 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या आता 133 वर पोहोचली आहे. एकाच दिवशी 18 कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल आज प्राप्त होताच अमरावतीत खळबळ उडाली.
अमरावतीत पहिला कोरोनाबाधित रुग्ण 3 एप्रिलला आढळला होता. तेव्हापासून सतत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. आज एकाच दिवशी 18 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
कोरोनाबाधितांचा उच्चांक; अमरावतीत एकाच दिवसात आढळले 18 कोरोनाचे रुग्ण, आकडा 133 वर यामध्ये नांदगाव पेठ परिसरातील 47 वर्षीय महिला, 44, 56, 30 वर्षांचे पुरुष आणि 84, 50, 30 वर्ष वयाच्या महिला, शिवनगर परिसरातील 22 आणि 46 वर्षांचा पुरुष, पार्वती नगर परिसरातील 32 वर्षीय पुरुष, पतीपुरा परिसरात 25 आणि 10 वर्षीय महिला, सिंधू नगर परिसरात 45 वर्षीय महिला, रहमत नगर परिसरातील 65 वर्षीय पुरुष तसेच बेलपुरा परिसरात 34 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेड झोनमध्ये असणाऱ्या अमरावतीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.