अमरावती -निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या कौशल्य विकासाला वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. येथील मुलांना आठवड्यातून एकदा तरी खुल्या वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी पुरेशी सुरक्षितता व मैदाने, बाग आदी सुविधा असलेल्या सीआरपीएफसारख्या कॅम्पसमध्ये भेट अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. महिला व बालविकास विभागाकडून जिल्ह्यात महिला व बालविकास भवन सुरू करण्यात आले. वर्किंग वूमन हॉस्टेल सुरू करण्यात येत आहे. महिलांच्या सोयीसाठी महिला आयोग व बालहक्क आयोगाचे कार्यालय विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
शासकीय मुलीचे निरीक्षणगृह व बालगृह येथील विद्यार्थिनींनी हस्तकलेद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी मेळाव्याचा शुभारंभ रविवारी (दि. 31) सकाळी बचतभवनात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या, निरीक्षणगृह व बालगृहातील मुलींनी प्रशिक्षण घेऊन कल्पकता व मेहनतीच्या बळावर सुंदर कलात्मक वस्तू तयार केल्या. या मुलांच्या कौशल्यांचा विकास घडवणे, मानसिक बळ व सकारात्मकता वाढविणे यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर हाती घेतला. ही प्रायोगिक तत्वावरील पण महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल व यादृष्टीने राज्यस्तरावर धोरणही आखण्यात येईल.
10 अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लाखांचे मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण
विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उद्याही खुले राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, महिला व बालविकास उपायुक्त शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे, बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री कोलखेडे, अतुल भडंगे, दिलीप काळे, विधी अधिकारी सीमा भाकरे, अनिरुद्ध पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनामुळे आई-वडील, असे दोन्ही पालक मृत्यू पावलेल्या 10 अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लाखांचे मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण मंत्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
53 योजनांचे पुनर्मुल्यांकन