अमरावती - अमरावती शहरात पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार झाला. या गोळीबारात तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे अमरावती शहर पुन्हा एकदा हादरले Firing In Amravati आहे.
दोन गटात वादकोणत्यातरी कारणाने चारा बाजार परिसरात दोन युवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन गट समोरासमोर आले. तेव्हा जुबेर सलीम पठाण या युवकावर काही लोकांनी तलवारीने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभारी जखमी झाला. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील अनेक जण रस्त्यावर उतरले होते.
शाळा परिसरालगत गोळीबारदोन गटात हाणामारी सुरू झाली असताना एका व्यक्तीने यावेळी गोळीबार केला. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास या परिसरात असणारी उर्दू असोसिएशन स्कूल सुटल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी या परिसरात होती. यावेळी झालेल्या गोळीबारात शाळेतून घराकडे जात असलेल्या तेरा वर्षीय चिमुकलीच्या पायाला गोळी लागली. या गोळीबारात ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.