अमरावती: अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील एक युवती मंगळवारी भरून निघून गेली होती. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले होते. दरम्यान संबंधित युवकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र त्या मुलीने घरून पळून जाण्याचा आणि या युवकाचा कुठलाही संबंध नसल्यामुळे आमच्या मुलाची विनाकारण बदनामी करण्यात आली अशी तक्रार त्या मुस्लिम युवकाच्या कुटुंबीयांनी राजापेठ पोलिसांना दिल्याने पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांवरही आरोप : अमरावतीत आंतरधर्मीय विवाहाच्या मुद्द्यावरुन चांगचाल गोंधळ झाला ( Amravati Love Jihad Case ) आहे. येथे एका मुलीला पळवून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना थेट पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला. तर भाजप खासदार अनिल बोंडेंही याप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या प्रकरणी अनेक सनसनाटी दावे केले. तर पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
राणा पोलीस ठाणअयात पोचल्या : हमालपुरा परिसरातील युवतीला मुस्लिम युवकाने पळून नेल्याची चर्चा शहरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. आज विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजापेठ पोलिसांना धडकले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी युवकाला अटक केली मात्र युवती नेमकी कुठे आहे. याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांना विचारले जात असतानाच खासदार नवनीत राणा देखील राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक ठाकरे ( Police Inspector Thackeray ) यांना मुस्लिम युवकाने हिंदू युवतीला पळून नेले या प्रकरणात तुम्ही युवकाला अटक केली मात्र आमची मुलगी कुठे आहे? असा प्रश्न केला.
पोलीस निरीक्षकांसोबत बाचाबाची:यावेळी पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा यांची आपल्या मोबाईल फोन मध्ये शूटिंग घेणे सुरू केले असताना खासदार नवनीत राणा यांनी माझी रेकॉर्डिंग का करता असा प्रश्न पोलीस निरीक्षकांना विचारला. यानंतर पोलीस निरीक्षक आणि खासदार नवनीत राणा यांच्या बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आक्रमक होत पोलीस निरीक्षकांच्या दालनात असलेले भाजप आणि विश्व हिंदू परिषदेसह युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तसेच पत्रकारांना देखील बाहेर काढले. यानंतर सुमारे अर्धा तासापर्यंत खासदार नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू होती.
माझं फोन रेकॉर्डिंग का केले: अमरावती नुकतेच आंतरधर्मीय लग्न झालेल्या हिंदू मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवलं आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये (Rajapeth Police Station) आणावे. पोलीस या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का करतायेत, असा सवाल करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला.तसेच त्यांचा फोन कॉल पोलीस ठाणेदाराने रेकॉर्ड केल्याने कोणत्या अधिकारात तुम्ही माझा फोन रेकॉर्ड केला अशी विचारणा करत त्या पोलिसांवर भडकल्या. जवळपास २० मिनिटे हा राडा सुरु होता. यावरुन माझं फोन रेकॉर्डिंग का केले असल्याचा सवाल खासदार नवनीत राणांनी पोलिसांना केले आहे.
पोलीस आणि कुटुंबीयांचाही रोष :दरम्यान संबंधित मुलगी सातारा येथे सुखरुप मिळाली तीने मी स्वताच गेली होती. माझे अपहरण झालेले नव्हते पकडलेल्या मुलाचा माझ्याशी काहीही संबंध नाही तीने सांगितले आणि हे प्रकरण शांत झाले दरम्यान माजी पोलीस अधिकाऱ्याने खासदार नवनीत राणा यांच्या या वागणुकीवर आक्षेप नोंदवत पोलीसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी नवनीत राणा यांनी माफी मागावी अशी मागणी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर एका पोलीसाच्या पत्नीने त्याच राजापेठ पोलीस ठाण्यात येऊन पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीना येणाऱ्या अडचणी मांडत नवनीत राणांचा निशेध केला