अमरावती -सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वंसामान्यांपासून ते श्रीमंताना विजेच्या भरमसाठ वीजबिलांचा शॉक देणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी करंट दिला आहे. शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करताना सहानुभूती दाखवा इंग्रजांसारखं वागू नका आणि ग्राहकांवर दादागिरी करू नका, असा सज्जड दमच मंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिला.
'वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसोबत इंग्रजासारखे वागू नका'
अमरावतीतील शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सर्व रक्कम भरण्याचा तगादा महावीतरणच्या अधिकार्यांकडून लावला जातो. तसेच शेतकर्यांची वीज जोडणी कापली जाते. अशा अनेक तक्रारी पालक मंत्री ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या याचा पाठपुरावा करताना कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांकडून जी असेल ती रक्कम स्वीकारा ऊर्जा विभागावर ताण येतो आहे. याची माहिती आहे, मात्र वीजबिल वसुली करताना शेतकऱ्यांसोबत इंग्रजासारखे वागू नका शक्य तितक्या साध्या पद्धतीने प्रक्रिया पार पाडा, असा सल्ला यावेळी वीज विभागातील अधिकाऱ्यांना दिला.