अमरावती अमरावती येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत तारण म्हणून ठेवलेले ३७ ग्राहकांचे २३०० ग्रॅम खरे सोने बनावट आढळून आल्याचे ऑडिट रिपोर्टवरून समोर आले आहे. ( Amravati Crime ) शिवाय ७० ते ७२ लाखांचे सोने तारण कर्जाचे बनावट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. यासोबतच अन्य प्रकरणात ८४ लाखांचा घोळही उजेडात आला आहे. ( Amravati Crime ) या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांसह चौघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Amravati Crime युनियन बँकेतील बनावट सोने तारण घोटाळा; ३७ ग्राहकांचे २३०० ग्रॅम सोने बनावट
Amravati Crime अमरावती येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत तारण म्हणून ठेवलेले ३७ ग्राहकांचे २३०० ग्रॅम खरे सोने बनावट आढळून आल्याचे ऑडिट रिपोर्टवरून समोर आले आहे. ( Amravati Crime ) शिवाय ७० ते ७२ लाखांचे सोने तारण कर्जाचे बनावट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
राजापेठ पोलीस ठाण्यात झाली होती तक्रार दाखल (Rajapeth Police Station ) जतीन प्रेमचंद कुंद्रा (३४) रा. अजमेर राजस्थान, गौरव पुरुषोत्तम शिंदे (४२) रा. महादेवखोरी, पवन अरुण तांडेकर (३४) व सतीश भोजणे (३३) दोघेही रा. हमालपुरा अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरातील आंचल विहार येथील रहिवासी उज्वल राजेशराव मळसने (४१) यांनी युनियन बँक ऑफ इंडिया राजापेठ येथील शाखेमध्ये १०० ग्रॅम सोने तारण म्हणून ठेवत ३ लाख ३० हजारांच्या कर्जाची उचल केली होती. ( Amravati Crime ) दरम्यान त्यांनी तारण म्हणून ठेवलेले दागिने हे बनावट असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी उज्वल मळसने यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताआर्थिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सर्वप्रथम बँकेला ऑडिट रिपोर्ट मागविला. बऱ्याच विलंबानंतर बँकेने ऑडिट रिपोर्ट सादर केला. सदर ऑडिट रिपोर्टवरून ३७ ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेले १ कोटी २१ लाख रुपयांचे २३०० ग्रॅम खरे सोने बनावट असल्याचे समोर आले आहे. ( Amravati Crime ) ७० ते ७२ लाखांचे सोने तारण कर्जाचे बनावट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ऑडिट रिपोर्टनुसार अन्य प्रकरणात ८४ लाखांचा घोळ झाल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपी संख्या वाढण्याची शक्यता आहे.