महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीत बनावट कोरोना विमा रॅकेट सक्रिय; रिपोर्ट पॉझिटिव्ह करून देणे सर्रास सुरू? - Fake corona insurance racket

निगेटिव्ह आलेला कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह करून देणारे मोठे बनावट कोरोना विमा रॅकेट अमरावतीत सक्रिय असल्याचा दावा खुद्द जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे.

amravati
अमरावती कोरोना

By

Published : Feb 23, 2021, 8:32 PM IST

Updated : Feb 23, 2021, 10:07 PM IST

अमरावती -एकीकडे अमरावतीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णवाढीमध्ये अमरावती अग्रेसर असल्याचे विविध अहवालातून समोर येत आहे. याच अनुषंगाने अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने का वाढत आहेत? याबाबतचा नवा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह आलेला कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह करून देणारे मोठे बनावट कोरोना विमा रॅकेट आहे, असा दावा खुद्द जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीदरम्यान केला आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे

अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी येथील टेस्टिंग लॅबमध्ये सदर प्रकार सुरू असल्याचे आणि याबद्दल स्वतःच त्यांना अनुभव आला असल्याचे प्रकाश साबळे यांनी सांगितले आहे. खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाची टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यात 15 दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार देखील सुरू आहे. असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या एका सभापतीसमोर घडला आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या तब्बल 50 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह करून देण्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीसमोर प्रकाश साबळे यांनी मांडल्यानंतर जिल्हा परिषदेने याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिले आहे.

Last Updated : Feb 23, 2021, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details