अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून परीक्षेचा जो निकाल दिला जाणार आहे तो गुणांऐवजी श्रेणीच्या आधारावर असणार आहे. या निर्णयाचा प्रस्ताव विद्यापीठाने तयार केला असून त्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाकडून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केली. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस मध्ये कुलगुरूंनी त्यांच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया - शिक्षणापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचे प्रयत्न आहेत अनेकदा पदवीला असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होते. असा प्रकार टाळण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे अनेकदा पदवीला असलेल्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण खंडित होते हा सर्व प्रकार टाळण्यासाठी पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना एकदाच ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असून प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमध्ये फिरण्याची विद्यार्थ्यांना गरज राहणार नाही असेही कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे म्हणाले.
विद्यापीठाची क्रीडाक्षेत्रातही भरारी - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही यावर्षी उत्कृष्ट भरारी घेतली असल्याचे कुलगुरू म्हणाले. यावर्षी अकरा पारितोषिके विद्यापीठाच्या खेळाडूंनी पटकाविली आहेत यामध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश असल्याचे कुलगुरू म्हणाले.
संशोधनावर दिला जाणार भर -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येणाऱ्या काळात संशोधनावर भर देणार आहे. सध्या नऊ विद्यार्थीच विद्यापीठात संशोधन करीत आहेत. संशोधकांची संख्या वाढण्याची नितांत गरज असून विद्यार्थ्यांना विद्यापीठ 24 तास उघडे ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी स्पष्ट केले.
अमरावती विद्यापीठात सर्वात स्वस्त शिक्षण - परदेशात एखाद्या अभ्यासक्रमासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येतो. याचा अभ्यास करण्यासाठी देशातील काही विद्यापीठांमध्ये 35000 रुपये शुल्क आकारले जातात. आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मात्र पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी केवळ साडेतीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असून आपल्या विद्यापीठात सर्वात स्वस्त शिक्षण मिळत असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे म्हणाले.