महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Exam Fever 2022 : अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन, पोलीस आणि विद्यार्थ्यांत शाब्दिक चकमक, विद्यापीठाला छावणीचे स्वरुप

Exam Fever 2022 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ( Sant Gadge Baba Amravati University ) परीक्षा ऑनलाईन ( Agitation For Online Exam in Amravati University ) पद्धतीने घ्यावी या मागणीसाठी एनएसयूआय (NSUI) संघटनेच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर मोर्चा निघाला ( Morcha For Online Exam In Amravati University ) होता. यावेळी विद्यापीठाचे प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले होते. हे प्रवेशद्वार ओलांडून मोर्चा विद्यापीठात शिरला. विद्यार्थ्यांचा मोर्चा थेट प्रशासकीय इमारतीजवळ धडकल्यानंतर तिथे पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि नंतर झटापट झाली.

Exam Fever 2022
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात धरपकड

By

Published : May 6, 2022, 2:02 PM IST

Updated : May 6, 2022, 4:33 PM IST

Exam Fever 2022 : अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ( Sant Gadge Baba Amravati University ) परीक्षा ऑनलाईन ( Agitation For Online Exam in Amravati University ) पद्धतीने घ्यावी या मागणीसाठी एनएसयूआय (NSUI) संघटनेच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर मोर्चा ( Morcha For Online Exam In Amravati University ) निघाला होता. यावेळी विद्यापीठाचे प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले होते. हे प्रवेशद्वार ओलांडून मोर्चा विद्यापीठात शिरला. विद्यार्थ्यांचा मोर्चा थेट प्रशासकीय इमारतीजवळ धडकल्यानंतर तिथे पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि नंतर झटापट झाली. या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ऑनलाईन परीक्षेची मागणी लावून धरली आहे.

एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांची प्रतिक्रिया

ऑनलाईन परीक्षेची मागणी - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज एनएसयूआय (NSUI) (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) या संघटनेने मोर्चा काढला होता. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख आणि प्रदेश महासचिव आकांक्षा ठाकूर यांच्या नेतृत्वात मोर्चा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारापासून प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांना निवदेन देण्यासाठी जाणार होता. दरम्यान पोलिसांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच त्यांना अडवले. विद्यार्थी मात्र त्यांना न जुमानता थेट प्रशासकीय इमारतीसमोर गेले. यावेळी पोलीस आणि संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वाद चकमक झाली. दरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्या पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षेची मागणी करत होते.

मुख्य प्रशासकीय इमारतीच्या समोर विद्यार्थी आंदोलन करताना

मोर्चा दरम्यान तणाव -एनएसयूआयच्या मोर्चाला पोलिसांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अडविले. मात्र एनएसयूआयचे कार्यकर्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढले. यानंतर विद्यार्थ्यांनी बंद असणाऱ्या प्रदेश दारावरून उड्या मारून विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. यानंतर एनएसयूआयचा मोर्चा थेट विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर धडकला. पोलिसांनी या मोर्चाला अडविण्याचे प्रयत्न केले मात्र या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी असणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना अडविण्यास पोलीस अपयशी ठरले. दरम्यान हा मोर्चा कुलगुरू कुलगुरू कार्यालयाच्या इमारतीवर धडकला असताना विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी या इमारतीचे दार बंद केले. या ठिकाणी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विधार्थांनी यावेळी कुलगुरूंच्या विरोधात घोषणा दिल्या.

विद्यार्थी आंदोलन करताना

विद्यापीठाला पोलीस छावणीचे स्वरूप -एनएसयूआयच्या मोर्चादरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तणाव निर्माण झाल्यावर परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस बोलावण्यात आली. पोलिसांचे जलद कृती दलही विद्यापीठात तैनात करण्यात आले. यावेळी विद्यापीठाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कुलगुरू यांच्यासमवेत चर्चा

कुलगुरूंना सादर केले निवेदन - विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी झाल्यावर पोलिसांनी एनएसयूआयच्या प्रतिनिधी मंडळाला कुलगुरूंना निवेदन सादर करण्यासाठी कुलगुरूंना भेटण्यासाठी आतमध्ये सोडले. प्रतिनिधी मंडळात असणारे अमीर शेख, आकांक्षा ठाकूर यांच्यासह एनएसयूआयचे अमरावती जिल्हा अध्यक्ष संकेत कुलट, संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नागेश करिअप्पा यांनी कुलगुरूकडे उन्हाळी परीक्षांसाठी ऑफलाईन सोबत ऑनलाईनचाही पर्याय असावा अशी मागणी शासनकडे करावी ही मागणी आली.

विद्यार्थी आंदोलन करताना

कुलगुरू म्हणाले - कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी तुमच्यावतीने जी काही मागणी करण्यात आली आहे, त्याबाबत आम्ही शासनाकडे कळवू शकतो, मात्र परीक्षा कशी घ्यावी अशी मागणी करू शकत नाही असे एनएसयूआयच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले. विद्यापीठाच्या वतीने जे पत्र शासनाला पाठविला जाणार आहे. त्याची प्रत आम्हाला द्यावी तोपर्यंत आम्ही विद्यापीठाच्या बाहेर ठिय्या देऊ अशी भूमिका यावेळी पदाधिकार्‍यांच्या वतीने घेण्यात आली.

हेही वाचा -Ankita Nagar Success : भाजीविक्रेत्याच्या मुलीची दिवाणी न्यायाधीशपदाकरिता निवड; तीनवेळा नापास झाल्यानंतरही सोडली नाही जिद्द

Last Updated : May 6, 2022, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details