महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Exam Fever 2022 - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील अभ्यासक्रमांना सी.बी.सी.एस. पद्धत लागू - अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे

शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निदेश, अध्यादेश व विनियम यांना सुध्दा विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली असून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक विभागांना सत्र 2022-23 पासून लागू होणार आहे. चारही विद्याशाखांनी याबाबत केलेल्या शिफारशी मान्य केल्या असून सी.बी.सी.एस. पध्दत लागू करतांना काही अभ्यासक्रम वगळण्यात आले आहेत. सी.बी.सी.एस. पध्दतीबाबत चारही अधिखात्यांनी सविस्तर सादरीकरण विद्या परिषदेच्या सभेत केले. त्यावर चर्चा होवून काही दुरूस्त्यांचा विचार करण्यात येवून ही पध्दती लागू करण्यात आली.

exam fever 2022 choice based credit system applied to courses at sant gadge baba amravati university
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

By

Published : May 5, 2022, 5:02 PM IST

अमरावती -संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान व आंतर विद्याशाखीय अभ्यास या चार विद्याशाखांमधील पदवी व पद्व्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पध्दत (चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाल बुधवारी झालेल्या विद्या परिषदेच्या सभेत घेण्यात आला. भारतामध्ये ही पध्दत अभ्यासक्रमामध्ये लागू करणारे अमरावती विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे.

2022-23 पासून होणार लागू -शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निदेश, अध्यादेश व विनियम यांना सुध्दा विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली असून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक विभागांना सत्र 2022-23 पासून लागू होणार आहे. चारही विद्याशाखांनी याबाबत केलेल्या शिफारशी मान्य केल्या असून सी.बी.सी.एस. पध्दत लागू करतांना काही अभ्यासक्रम वगळण्यात आले आहेत. सी.बी.सी.एस. पध्दतीबाबत चारही अधिखात्यांनी सविस्तर सादरीकरण विद्या परिषदेच्या सभेत केले. त्यावर चर्चा होवून काही दुरूस्त्यांचा विचार करण्यात येवून ही पध्दती लागू करण्यात आली. पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेमिस्टर पध्दत लागू राहणार असून विद्याथ्र्यांना आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करता येणार असून त्याचे क्रेडीट त्यांना मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थी रोजगारक्षम होईल.

विषयांचा असा असेल समावेश -अॅबिलीटी एन्हान्समेन्ट, कम्युनिकेशन स्कील, डीसीप्लीन स्पेसिपीक कोअर कोर्सेस, इलेक्टीव्ह, प्रोजेक्ट, फाऊंडेशन, जेनेरीक इलेक्टीव्ह, जेनेटिक ओपन इलेक्टीव्ह, जनरल इन्टरेस्ट, स्कील एन्हान्समेन्ट अभ्यासक्रम तसेच इंडक्शन प्रोग्राम, इंटर्नशिप, अँप्रेन्टन्शीप, फिल्ड वर्क, कार्य अनुभव,MOOCS, SWAYAM यांसह अभ्यासेत्तर व अभ्यासपुरक अँक्टीव्हीटीज आणि या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना क्रेडीट कसे मिळतील, याबाबतची सविस्तर माहिती यावेळी सादर करण्यात आली. एस.जी.पी.ए. व सी.सी.पी.ए. चे सूत्र सुध्दा यावेळी मान्य करण्यात आले.

अभ्यासमंडळे तयार करणार नवीन अभ्यासक्रम -विद्या परिषदेने सी.बी.सी.एस.ला मान्यता दिल्यानंतर सर्व अभ्यास मंडळे आपापल्या विषयाचे पदवी व पद्व्युत्तर स्तरावरील नवीन अभ्यासक्रम लवकरच तयार करणार आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. सी. बी. सी. एस. बाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे योजिले आहे. 30 जूनपर्यंत प्रत्येक पदवी अभ्यासक्रमांच्या दोन सेमिस्टरचे सिलॅबस तयार होणार आहे.

सी.बी.सी.एस. वर विषयनिहाय प्रशिक्षण वर्ग -सर्व शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करण्यात आली असून येत्या दोन महिन्यामध्ये त्यांचेशी संबंधित विषयावर सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी होण्यासाठी व नवनवीन विचार यावेत, यासाठी पन्नास पन्नासच्या बॅचेसमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.

रिव्ह्रू समितीची स्थापना -सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, त्याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे निवारण होण्यासाठी रिव्ह्रू समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश असणार असून त्या माध्यमातून मॉनिटर केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details