अमरावती - पुन्हा कोरोनाचा धोका होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने यंदाही कोरोना नियम पळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार गणरायाची मूर्ती चार फुटांपेक्षा मोठी नसेल. त्यामुळे मूर्तीकारांनी चार फुटांच्या मूर्तीलाच आकार दिला आहे. कोरोनामुळे गणेशोत्सवालाच जल्लोष हवा तसा नसल्याने गणपती बनविणाऱ्या मूर्तिकारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
यंदाही गणपतीची मूर्ती चार फुटांचीच; मूर्तिकारांना आर्थिक झळ - Financial blow to sculptors
अमरावती शहरात एकूण 296 सार्वजनिक गणेशोत्व मंडळात श्रींची स्थापना केली जाते. यंदा मात्र, केवळ 54 गणेशोत्सव मंडळांनाच गणपती स्थापनेची परवानगी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1151 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून त्यापैकी 289 सार्वजनिक मंडळांनाच गणपती स्थापन करण्याची परवानगी आहे.

सार्वजनिक मंडळ कमी झाल्याचा फटका
अमरावती शहरात एकूण 296 सार्वजनिक गणेशोत्व मंडळात श्रींची स्थापना केली जाते. यंदा मात्र, केवळ 54 गणेशोत्सव मंडळांनाच गणपती स्थापनेची परवानगी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1151 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून त्यापैकी 289 सार्वजनिक मंडळांनाच गणपती स्थापन करण्याची परवानगी आहे. याआधी एकाच परिसरात चार ते पाच मंडळात गणरायाची स्थापना केली जात होती. मात्र, आता कोरोनामुळे एकाच परिसरात एकाच मंडळाला परवानगी देण्यात आली आहे. मोठ्या संख्येतील सार्वजनिक मंडळात गणपतीची स्थापना होणार नसल्याने याचा परिणाम मूर्तिकारांच्या व्यवसायावर होत आहे.