अमरावतीअमरावती शहरात Amravati City एका पर्यावरणप्रेमी मूर्तिकाराकडून Environmentalist Sculptor Nilesh Kanchanpure गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी those who buy the idol करणाऱ्या भाविकांना गणरायाच्या मूर्तीसोबत एक कुंडी आणि त्यामध्ये लावण्यासाठी एक रोपटे भेट स्वरूपात Gift of plant and pot दिले जात आहे. गणपती उत्सव काळात वृक्षारोपणाला प्रोत्साहन Encouragement of tree plantation during Ganapati festival देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. या मूर्तिकाराला पर्यावरण प्रेमी भाविकांकडून उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे.
असा आहे हा उपक्रमअमरावती शहरात वृक्ष संवर्धन तसेच वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी, सदैव पुढाकार घेणारे निलेश कांचनपुरे यांचा अनेक पिढ्यांपासून मूर्ती घडविण्याचा व्यवसाय आहे. गणेशोत्सव काळात 39 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या वतीने, गणपतीच्या मूर्ती तयार करून विक्रीचा व्यवसाय केला जातो. गणपती उत्सवा दरम्यान अमरावतीकरांनी वृक्षारोपण करावे, या उद्देशाने निलेश कंचनपुरे यांनी आपल्याकडे मूर्ती घेणाऱ्या भाविकांना एक कुंडी आणि त्यासोबत एका वृक्षाचे रोप भेट स्वरूपात देत आहेत. या उपक्रमाला सामाजिक वनीकरणाच्या वतीने सहकार्य केले जात आहे. यासाठी अतिशय माफक दरात वडाळी येथील रोपवाटिकेतून सामाजिक वनीकरणाच्या वतीने, निलेश कांचनपुरे यांना विविध वृक्षांची रोपे पुरविण्यात आली. गणरायाची मूर्ती खरेदी करणाऱ्यांना एक रोप आणि त्यासोबत मातीची कुंडी यावर्षी दिली जात आहे.