महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eklavya Dhanurvidya Sports Academy : नांदगाव खंडेश्वर परिसरात अनेक धनुर्धारी; राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर आता लक्ष 'ऑलिंपिक - एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी अमरावती

अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वरमध्ये एकलव्य धनुर्विद्या क्रीडा ( Eklavya Dhanurvidya Sports Academy ) ही अकादमी आहे. येथे अनेक युवक धनुर्धारी होत आहेत. येथील धनुर्धानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली आहे. त्यांचे लक्ष आता ऑलिंपिक स्पर्धा आहे.

Eklavya Dhanurvidya Sports Academy
Eklavya Dhanurvidya Sports Academy

By

Published : Jul 23, 2022, 10:50 PM IST

Updated : Jul 24, 2022, 4:21 PM IST

अमरावती -अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वरसारख्या ग्रामीण परिसरात धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेऊन अनेक युवक धनुर्धारी होत आहेत. केवळ नांदगाव खंडेश्वर किंवा लगतच्या परिसरातीलच नव्हे तर अमरावती जिल्ह्या बाहेरचे अनेक युवक नांदगाव येथे येत धनुर्विद्या शिकत आहेत. नांदगाव खंडेश्वर येथे 1998 मध्ये स्थापन झालेल्या एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या ( Eklavya Dhanurvidya Sports Academy In Amravati ) धनुरधाऱ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली. आता या अकादमीचे टार्गेट 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक मध्ये देशाला गौरव मिळवून देण्याचे ( Eklavya Dhanurvidya Sports Academy Student Target Olympic ) आहे.

विद्यार्थी, सचिव आणि संस्थापक यांची प्रतिक्रिया

वृषाली गोरले पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू - एकलव्य धनुर्विद्या अकादमी येथे सराव करणारे एकूण तीन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली आहे. 2008 साली वृषाली गोरले भारतीय संघात निवड झाली यानंतर तिची एक नव्हे तर तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वृषालीने एक सुवर्ण आणि दोन कास्यपदक पटकाविले. 14 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्णरोप या कांस्यपदकासह तिने एकूण 14 पदक प्राप्त केले होते. उत्कृष्ट धनुर्धारी असणाऱ्या वृषाली गोरले हीची 2010 मध्ये भारतीय रेल्वेत निवड झाली. 2017 मध्ये तिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला.

साक्षी तोटेने स्पेनमध्ये केले प्रतिनिधित्व - या अकादमीत साक्षी तोटे हिने 2013 मध्ये धनुर्विद्या खेळाचा सरावाला सुरुवात केली. 17 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान स्पेनच्या मद्रिद शहरात आयोजित युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ती सहभागी झाली होती. साक्षी तोटेहीने आठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्ण कांस्यपदकासह तीन पदके प्राप्त केली. टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी देखील साक्षी तोटेची निवड झाली होती.

मंजिरी अलोनेने पोलांड मध्ये पटकाविले कास्यपदक - 9 ते 15 ऑगस्ट 2021 दरम्यान पोलंड येथे आयोजित युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या अकादमीची मंजिरी अलोणे हिने युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये वैयक्तिक कास्यपदक व सांघिक कास्यपदक मिळविले होते. मंजिरीने आतापर्यंत तीन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एक सुवर्ण एक रोप्य आणि एक कास्यपदक पटकाविले आहे.

एकलव्य धनुर्विद्या अकादमीने दिले 150 राष्ट्रीय खेळाडू -नांदगाव खंडेश्वर या छोट्याशा तालुक्यातील एकलव्य धनुर्विद्या अकादमीने आतापर्यंत 150 राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंनी 1998 पासून 2018 पर्यंत एकूण 66 सुवर्णपदक 59 रोप्य पदक, 49 कास्यपदक असे एकूण 200 पदक राष्ट्रीय स्पर्धेत पटकाविली आहेत. यासह राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 208 सुवर्ण, 134 रोप्य आणि 169 कास्य असे एकूण 491 पदक मिळविली आहेत.

सदानंद जाधव नांदगाव खंडेश्वर मधील द्रोणाचार्य - अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर सारख्या ग्रामीण परिसरातून धनुर्विद्येसारख्या खेळात एकूण तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत असून, 100 च्या जवळ धनुर्धारी राष्ट्रीय पातळीवर बाजी मालिका आहेत. या सर्व धनुधाऱ्यांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण देणारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक सदानंद जाधव हे नांदगाव खंडेश्वर मधील द्रोणाचार्य या नावाने आता ओळखले जात आहेत. मूळचे दर्यापूर येथील रहिवासी असणारे सदानंद जाधव हे आता कायमस्वरूपी नांदगाव खंडेश्वर मध्ये स्थायिक झाले आहेत. 12 जानेवारी 1998 ला स्वामी विवेकानंद जयंती पर्वावर सदानंद जाधव यांनी एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची स्थापना केली. धनुर्विद्या खेळातील योगदानाबद्दल त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

अशी झाली सुरुवात -नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या फुपगाव या गावात 1998 मध्ये इयत्ता सातवीत शिकणारी वृषाली गोरले या गरीब विद्यार्थिनीने तुटपुंजा साधनाच्या बळावर सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात धनुर्विद्येचा सराव सुरू केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवी पर्यंतच वर्ग असल्यामुळे यापुढे आपल्या धनुर्विद्येच्या सरावाचे काय असा प्रश्न वृषाली गोरले ह्या चिमुकली समोर उभा ठाकला. वृषालीची व्यथा पाहून सदानंद जाधव यांनी नांदगाव खंडेश्वर येथे या धनुर्विद्या अकादमीची स्थापना केली, अशी माहिती या अकादमीचे सचिव विलास मारोटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

अकादमीचे 32 खेळाडू शासकीय सेवेत -1998 पासून नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी येथे दरवर्षी शेकडो खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. या अकादमीच्या माध्यमातून 150 च्या वर खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला असून धनुर्विद्या या खेळातील यशामुळे एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे एकूण 32 खेळाडू शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. यावर्षी 69 ते 80 खेळाडू नियमित सराव करीत आहेत. या अकादमीच्या मैदानावर लहान नव्याने मैदानात उतरलेल्या लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था असून 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर आणि 50 मीटर अंतरापर्यंत बाळाचा मारा करता येईल, अशी खास सुविधा या अकादमीच्या मैदानावर आहे. ऑलम्पिक स्पर्धेत असणाऱ्या 70 मीटरच्या मैदानाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू 70 मीटरच्या मैदानावर नियमित सराव करतात तर इतर खेळाडू हे त्यांच्या वयोगटांनुसार 30 40 आणि 50 मीटरच्या मैदानावर नियमित सराव करीत असल्याची माहिती प्रशिक्षक अमर जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या मैदानावर सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत बाराही महिने सराव सुरू असतो. पाऊस आला तर धनुर्विद्येच्या सरावा करिता क्रीडा सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सरावाला कधीही खंड पडत नाही, असेही अमर जाधव म्हणाले.

आता ऑलिंपिक हेच ध्येय -आमच्या एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. आमच्या येथील साक्षी तोटे हिची टोकियो 2020 ऑलिंपिक सरावासाठी निवड झाली होती. मात्र, आता 2024 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेकडे आमचे लक्ष आहे. आमच्या नांदगाव खंडेश्वर येथील धनुर्धारी सहभागी होऊन ऑलिंपिकमध्ये बाजी मारतील हेच आमचे ध्येय असल्याचे एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे संस्थापक सदानंद जाधव 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. आमच्या अकादमीत आम्ही धनुर्विद्येचे प्रशिक्षण निशुल्क देतो. आमच्या खेळाडूंना शासकीय मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, असे सदानंद जाधव यांनी म्हटलं.

हेही वाचा -Dhol Tasa Tradition: 'तरुणाईच्या उत्साहामुळे ढोल- ताशा उद्योगाला भरभराट, कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

Last Updated : Jul 24, 2022, 4:21 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details