अमरावती - इंग्रजी आणि आता मराठी शाळेंकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून, ज्या संस्था या पालकांच्या भरवशावर मोठ्या झाल्या अशा संस्थेनी फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थेनी लक्षात ठेवावं, असेही बच्चू कडू म्हणाले.
'शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत द्यावी, अन्यथा कारवाई'
सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थांनी उभं राहावं, असं आवाहन देखील बच्चू कडू यांनी केलं.
सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थेनी उभं राहावं असं आवाहन देखील बच्चू कडू यांनी केलं. जर शिक्षण संस्था जुमानल्या नाही तर सरकार म्हणून आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
पुढे बोलतांना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांवर दर दोन-तीन महिन्यांनी संकट येत राहतात. पण शिक्षण संस्थेवर आतापर्यत कुठलंच संकट आले नाही. आतापर्यंत शिक्षण संस्था या फायद्यातच होत्या. आतापर्यत एखाद्या संस्थेने सांगावे की आमची संस्था तोट्यात आहे. मागील २० वर्षांपासून या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फीवर आम्ही कधी बोललो नाही. पण आता हे संकट मोठे आहे, त्यामुळे किमान यावर्षी विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी ५० टक्केच फी आकारावी, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीं केली.