अमरावतीअमरावती विमानतळावरून 6 महिन्यात विमान आकाशात झेप घेणार, असे गत 10 वर्षांपासून अमरावतीकरांना स्वप्न दाखविले जात आहे. राज्यातील अनेक छोट्या शहरात विमानसेवा सुरू झाली असताना विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत अद्यापही विमानसेवाचा पत्ता नाही. राजकीय मंडळींचे विमानतळा संदर्भात आश्वासन गगन भरारी घेत असताना विमान मात्र अद्यापही जमिनीवरच असल्याचे वास्तव आहे.
2014 पासून केवळ कामच सुरूअमरावतीच्या प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्यावर अमरावतीच्या विमानतळाचा विकास होऊन अमरावतीतून मुंबई पुण्यासाठी विमान लवकरच झेप घेणार अशी आशा पल्लवित झाली होती. 2014 मध्ये अमरावतीचे तत्कालीन आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे अमरावती विमानतळासाठी मोठा निधी प्राप्त झाला आणि विमानतळ विस्तारीकरणाला मान्यता मिळाली. 13 जुलै 2019 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या हस्ते अमरावती विमानतळ विस्तारीकरणाच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. औद्योगिक दृष्ट्या विकसित होणाऱ्या अमरावती शहरात आता उद्योगांना सुद्धा जागा कमी पडत असून अमरावतीच्या विकासाला अधिक गती येण्यास अमरावती विमानतळ अतिशय महत्त्वाचे ठरणार असून सुरुवातीला अमरावती- मुंबई विमान सेवा सुरू झाल्यावर इतर शहरातही अमरावती येथून विमान सेवा सुरू करण्यात येईल. भविष्यात जेट विमानही अमरावतीतून भविष्यात जेट विमानही, उड्डाण घेईल असे आश्वासन त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज मात्र काम झपाट्याने सुरू आहे, या पलीकडे अमरावती विमानतळा संदर्भात कोणीही इतर माहिती देत नाही.
2020 च्या ऑगस्ट मध्ये झेपावणार होते पहिले विमानअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी 13 नोव्हेंबर 2019 रोजी अमरावती विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी 872 मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम जोमात सुरू असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते. त्यावेळी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केल्यावर 2020 च्या ऑगस्ट महिन्यात अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी विमान झेप घेणार, असे विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते.
50 कोटी रुपयांसाठी रखडले होते कामकोरोना काळात अमरावती विमानतळाचे काम थांबले होते. यामुळे 2020 चा ऑगस्ट महिन्यात अमरावती विमानतळावरून विमान झेप घेऊ शकले नाही. विशेष म्हणजे राज्य शासनाने अमरावती विमानतळासाठी 50 कोटी रुपये दिले नसल्याने हे काम रखडले गेले. 27 जानेवारी 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते. हे 50 कोटी रुपये शासनाने अमरावती विमानतळाला अद्यापही दिले की नाही हे सध्या तरी कोणालाही ठाऊक नाही.