महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गर्दी करू नका; अमरावती महापालिका आयुक्तांचे आवाहन - amravati corona latest news

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

amravati
अमरावती

By

Published : Mar 19, 2020, 9:15 PM IST

अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमरावती महापालिका आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असून अमरावतीकरांनी विनाकारण कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.

गर्दी करू नका; अमरावती महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याबाबत महापालिका आयुक्त म्हणले, सायंकाळी शहरात सर्वत्र फवारणी केली जात आहे. मटण आणि चिकन विक्रेत्यांनी त्यांचे वेस्टज घंटागाडीत टाकावेत. शहरात गर्दी होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. महापलिकेशी संबंधित जी कामे नागरिकांना असतील ती कामे त्यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे करावीत. महापालिकेच्या आवारात गर्दी करणे नागरिकांनी टाळावे. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींची दखल निश्चितपणे घेतली जाणार आहे. सद्या जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्याचा सामना करण्यासाठी कशाचीही भीती न बाळगता सहकार्य करण्याचे आवाहनही महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details