अमरावती -अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर ( Praven Ashtikar Ink Thrown Case ) यांच्या वरील शाईफेक प्रकरणात आरोपी असणाऱ्या आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग ( DGP Rajendra Singh In Amravati ) अमरावतीत आले होते. त्यांनी या प्रकरणी आमदार रवी राणा यांचा जवाब नोंदवला. दरम्यान, जवाब नोंदवून बाहेर आल्यानंतर 'अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह आणि अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे दोघेही भ्रष्ट अधिकारी आहेत. माझ्या विरोधात खोटी तक्रार देणारे महापालिका आयुक्त आणि माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस आयुक्त यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी चौकशी करावी', अशी मागणी रवी राणा यांनी केली.
काय आहे प्रकरण -राजापेठ उड्डाणपुलावर 12 जानेवारीला आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. मात्र, हा पुतळा महापालिका आयुक्तांनी 16 जानेवारीला मध्यरात्री काढून टाकल्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असून यामुळे आम्ही शिवप्रेमी महापालिका आयुक्तांचा निषेध नोंदवतो, असे पत्र ही यावेळी देण्यात आले होते. तर काही आक्रमक महिलांनी शहरातील राजापेठ अंडरपासची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना बोलावून त्यांच्यावर अचानक शाईफेक केली होती. यावेळी महिलांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. याच प्रकणात रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.