अमरावती:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीत आले आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. फडणवीस पालकमंत्री म्हणून प्रथमच अमरावतीत आले आहेत. (Devendra Fadanvis in Amravati). त्यांचे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana), माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्राम भवन येथे स्वागत केले.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत, जिल्ह्याची आढावा बैठक घेणार - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीत आले आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. (Devendra Fadanvis in Amravati).

देवेंद्र फडणवीस
हेलिपॅडवर स्वागत:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील हेलिपॅड वर दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त पांढरपट्टे व जिल्हाधिकारी अवनीत कौर यांनी त्यांचे स्वागत केले. फडणवीस जेथे निवासाला आहेत त्या शासकीय विश्राम भवनात जिल्ह्यातील विविध समस्या मांडण्यासाठी अनेक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.