महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शेगावनाका चौकात ट्रकने सायकलस्वार वृद्धास चिरडले - अमरावतीमधील शेगावनाका

सिग्नल लागलेला असल्याने घटनास्थळी वाहनांची मोठी गर्दी झालेली होती. अशातच सिग्नल सुटला आणि एक सायकलस्वार अचानक ट्रक समोर आला. यात सायकलस्वाराचा चिरडून मृत्यू झाला आहे.

अमरावती अपघात
अमरावती अपघात

By

Published : Sep 26, 2020, 4:24 PM IST

अमरावती - शहरातील शेगाव नाका चौकात अचानक समोर आलेल्या सायकलला ट्रकची धडकबसून सायकलस्वार ट्रकखाली चिरडला गेला. या अपघातामुळे शेगाव नाका चौकात खळबळ उडाली. जियालदास मोटवाणी (65) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते रामपुरी कॅम्प परिसरातील कृष्णानगर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती माहिती पोलिसांनी दिली आहे.

गाडगेनगर पोलीस ठाण्यालागतच हा अपघात घडला. विलास नगरवरून वलगावकडे जात असताना शेगावनाका चौकात ट्राफिक सिग्नलमुळे विलास नागरकडून गाडगेनगर आणि शेगाव परिसराकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाली होती. दरम्यान, या ट्रकला डाव्या बाजूला वळून वलगावाकडे जायचे असले तरी समोर वाहने उभी असल्याने हा ट्रक उभा होता. दरम्यान, सिग्नल मिळताच या मार्गावरील वाहने समोर निघाली, ट्रक वलगावला जाण्यासाठी कठोरा नाक्याकडे वळतात ट्रकच्या बाजूला असणारा सायकलस्वार अचानक ट्रकच्या मधात आला. अचानक समोर आल्याने ट्रकचालकास नेमके काय होत आहे हे कळायच्या आत सायकलस्वाराच्या अंगावरून ट्रक गेला. या अपघातात सायकलस्वार जियालदास मोटवणी घटनास्थळीच ठार झाले. गाडगे नगर पोलिसांनी त्यांच्या मृतदेहावर कापड टाकून तो आहे तिथेच झाकून ठेवला. यानंतर ट्रक चालकास ताब्यात घेतले.

या घटनेनंतर बराच वेळ रस्त्यावर पडलेल्या मृतदेहा शेजारून वाहने जात होती. काही वेळातच मृत जियालदास मोटवाणी यांचा मुलगा निखिल मोटवाणी घटनास्थळी पोहचला. यानंतर रुग्णवाहिकेतून जियालदास मोटवाणी यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. गाडगे नगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचाव -'रेमडेसिव्हिर औषधांच्या वापराबाबत लवकरच टास्कफोर्स नेमणार, गैरवापर होऊ देणार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details