महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सीआरपीएफची राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅली - CRPF soldiers organize Cycle Rally

देशाचा 75 वा स्वतंत्रदिन आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या वतीने 12 ऑक्टोंबरला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी ही सायकल रॅली तिवसा शहरात पोहोचली.

cycle rally
सायकल रॅली

By

Published : Oct 17, 2021, 3:52 PM IST

अमरावती - देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यवर्ष तसेच 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने 12 ऑक्टोंबरला गडचिरोलीमधून निघालेली सीआरपीएफच्या पंचवीस जवानांची सायकल रॅली रविवारी अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे.अमरावतीच्या तिवसा शहरात या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

सायकल रॅलीचे केले जंगी स्वागत

ही सायकल रॅली तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे पोहोचली. महासमाधीवर दाखल झाल्यानंतर या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी या जवानांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तुकडोजी महाराज यांचे स्वतंत्र भारताच्या चळवळीतील योगदान समजून घेतले. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. 31 तारखेला ही रॅली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया येथे दाखल होणार आहे. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिवस हा कार्यक्रम होईल. या सायकल रॅलीचे नेतृत्व अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट डॉ. चेतन शेलोटकर करत आहे.

राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅली

1100 किमीचा प्रवास
या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, फिजिकल फिटनेस जनजागृती, देशाचीअखंडता, देशभक्ती, देशप्रेम निर्माण करणे तसेच सैनिकांना श्रद्धांजली वाहणे हे या सायकल रॅलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. 12 ऑक्टोंबरला निघालेली सायकल रॅली रविवारी अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे. जवळपास वीस दिवसांचा प्रवास करून ही सायकल रॅली गुजरात मधील केवडिया येथे दाखल होणार आहे. गडचिरोलीवरून निघालेली जवानांची सायकल रॅली अंदाजे बारा ते तेरा जिल्ह्यांमधून जाणार असून अकराशे किलोमीटर अंतर वार करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या रॅलीचे स्वागत होणार आहे रविवारी अमरावती जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर या रॅलीचे स्वागत झाले. दोन दिवस ही सायकल रॅली अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांनी विविध ठिकाणी या सायकल रॅलीच्या स्वागत केले.
हेही वाचा -पुण्यात डिझेल 100 पार, तर पेट्रोलने 111चा टप्पा ओलांडला; ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details