अमरावती -शहरातील पेट्रोल पंपांवर सोमवारी सायंकाळी अचानक गर्दी उसळल्याने तारांबळ उडाली. इर्विन चौक, हमालपुरा परिसर, मालटेकडी लगतच्या पोलीस पेट्रोल पंप, पंचवटी चौक येथील पेट्रोल पंप नवाथे चौक, साई नगर परिसर, बडनेरा, वलगाव मार्डी मार्गावरील पेट्रोल पंप या सर्वच पेट्रोल पंपावर अचानक गर्दी उसळल्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपापासून अर्धा किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Amravati Petrol Pump : अमरावतीत पेट्रोल पंपावर उसळली गर्दी; 'हे' आहे कारण - अमरावती पेट्रोल पंपा बंद
अमरावती शहरातील पेट्रोल पंपांवर सोमवारी सायंकाळी अचानक गर्दी उसळल्याने तारांबळ उडाली. 31 मे रोजी आम्ही पेट्रोल डिझेल खरेदी बंद आंदोलन करणार आहोत असे पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने जाहीर केल्यामुळे उद्यापासून अमरावतीत पेट्रोल मिळणार नाही असा समज करून अमरावती शहरातील शेकडो वाहन धारकांची गर्दी पेट्रोल पंपावर उसळली आहे.
...म्हणून पेट्रोल पंपावर उसळली गर्दी - अमरावती जिल्हा पेट्रोल पंप डीलर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून मंगळवार 31 मे रोजी देशव्यापी पेट्रोल डिझेल खरेदी बंद आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गुंतवणूक खर्चात प्रचंड वाढ झाली असून, चुकीच्या दर पद्धतीमुळे पेट्रोल पंप चालकांना आर्थिक संकट सोसावे लागत आहे. 2017 पासून मार्जिनमध्येसुद्धा वाढ झाली नाही. यामुळे 31 मे रोजी आम्ही पेट्रोल डिझेल खरेदी बंद आंदोलन करणार आहोत असे पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने जाहीर केल्यामुळे उद्यापासून अमरावतीत पेट्रोल मिळणार नाही असा समज करून अमरावती शहरातील शेकडो वाहन धारकांची गर्दी पेट्रोल पंपावर उसळली आहे.
एसटी बसही पेट्रोल पंपावर - राज्य परिवहन महामंडळाला डिझेलचा पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबतच्या कराराचा नव्याने विचार करण्यात आला नसल्यामुळे सदर कंपनीने राज्य परिवहन महामंडळाला डिझेल देणे थांबविले आहे. यामुळे अनेक एसटी बसही पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र अमरावती शहरातील विविध पेट्रोल पंपावर पाहायला मिळत आहे.