महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचा प्रभाव: घरच्या छतावर कृत्रिम तलाव निर्माण करून केली छटपूजा

अमरावती शहरातील रुख्मिणी नगर परिसरातील रहिवासी दिनेश सिंह यांनी आपल्या घराच्या छतावर एका बाजूला पाणी अडवून कृत्रिम तलाव निर्माण केला. या तलावात पूजेची सर्व तयारी करून मोठ्या उत्साहात छटपूजा करण्यात आली.

chhatpuja in artificial pond
कृत्रिम तलाव निर्माण करून केली छटपूजा

By

Published : Nov 20, 2020, 9:44 PM IST

अमरावती - कार्तिक शुक्ल पक्षात हिंदी भाषिक नदी, तलाव असे पाण्याचे स्रोत असणाऱ्या ठिकाणी मोठ्या उत्साहात छटपूजा साजरी करतात. यावर्षी कोरोनामुळे अमरावती शहरातील छत्री तलावात ही पूजा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने अनेकांनी आपापल्या परीने शुक्रवारी छट पूजा केली. रुख्मिणी नगर परिसरातील रहिवासी दिनेश सिंह यांनी आपल्या घराच्या छतावर एका बाजूला पाणी अडवून कृत्रिम तलाव निर्माण केला. या तलावात पूजेची सर्व तयारी करण्यात आली. घरातील मंडळीसह आप्तस्वकियांना पूजेसाठी निमंत्रण देण्यात आले आणि मावळत्या सूर्याला यावेळी उपस्थित सर्वांनी पाणी अर्पण करून पूजा केली.

कृत्रिम तलाव निर्माण करून केली छटपूजा
मोजक्या नातेवाईकांची उपस्थिती -
छट पूजेसाठी दिनेश सिंह यांनी मोजक्या आप्त स्वकीयांसह काही मित्रांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. येणाऱ्या प्रत्येकीच्या हातावर सॅनिटायझर मारण्यात आले. धार्मिक सोहळा असला तरी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.
होमही पेटवला -
छतावर निर्माण करण्यात आलेल्या तालावाच्या पाण्यात मावळत्या सूर्याला दूध आणि पाणी अर्पण केल्यावर परंपरेनुसार होम पेटविण्यात आला. तूप आणि धान्याची आहुती होममध्ये देण्यात आली.
कोरोनामुळे वाढला उत्साह !

खरं तर कोरोनामुळे कुणीही आनंदात नसलं तरी आज छटपूजेसाठी घराच्या छतावर तलाव निर्माण केला. स्वच्छ पाण्यात उभं राहून सूर्याला नमस्कार केला पाणी दूध अर्पण केले हा सगळा प्रसंग तलावातील अस्वच्छ पाण्यात पूजा करताना येत नाही. आजची पूजा ही पवित्र आणि आनंददायी झाली याचं आम्हाला समाधान वाटतं, अशी प्रतिक्रिया दिनेश सिंह यांच्यासह या उत्सवात सहभागी सर्वांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details