महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

SGBA University : विद्यार्थी विकास संचालकांची नियुक्ती वादग्रस्त, कुलगुरूंच्या दालनासमोर एनएसयूआयचा ठिय्या - Student Development Director Post

डॉ. बोरकर यांची नियुक्ती वादग्रस्त ( Dr. Borkar appointment controversial ) असल्याने कुलगुरूंनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी एनएसयूआयच्या वतीने कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या देण्यात आला आहे.

Sanket Kulat
Sanket Kulat

By

Published : Apr 7, 2022, 9:04 PM IST

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ( Sant Gadge Baba Amravati University ) नवनियुक्त विद्यार्थी विकास संचालक म्हणून डॉ. राकेश बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती विरोधात एनएसयूआयने आंदोलन छेडले आहे. डॉ. बोरकर यांची नियुक्ती वादग्रस्त ( Dr. Borkar appointment controversial ) असल्याने कुलगुरूंनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी एनएसयूआयच्या वतीने कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या देण्यात आला आहे.

कुलगुरूंच्या दालनासमोर एनएसयूआयचा ठिय्या


काय आहे आरोप? - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास संचालक पदावर बार्शी टाकळी येथील महाविद्यालयात कार्यरत असलेले, डॉ. राजेश बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बोरकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ) आहेत. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती विद्यार्थी विकास संचालक पदावर करणे, हे संयुक्तिक नाही. विद्यार्थी विकास संचालकांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेतल्या जातात. एका राजकीय पदावरील व्यक्ती, अशा निवडणुका योग्यपणे घेऊ शकत नाही. असा आरोप एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट ( NSUI District Sanket Kulat ) यांनी केला आहे.



तीव्र आंदोलनाचा दिला इशारा - कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे ( Vice Chancellor Dr. Dilip Malkhede ) यांनी विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजेश बोरकर यांच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा व्यक्ती विद्यार्थी विकास संचालक पदावर नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. संबंधित राजकीय व्यक्तीस पदावरून हटविले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील एनएसयूआय जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांनी दिला आहे. कुलगुरूंनी मात्र यासंदर्भात पत्रकारांशी बोलण्यास टाळले.



हेही वाचा -आमदार रवी राणा यांची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी; महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण

ABOUT THE AUTHOR

...view details