अमरावती : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ( Demand to declare wet drought in amravati ) काँग्रेस आक्रमक झाली असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे ( panchanamas of damage due to heavy rain ) व भरपाईसाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वखाली कार्यकर्ते जिल्हा कचेरीवर धडकले होते. ( Amravati Rural Congress Aggressive )
झालेल्या नुकसानाचा त्वरित पंचनामा व्हावा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे व संत्रा फळबागांचे प्रंचड नुकसान झाले आहे. नदी व नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने जमीन खरडून निघाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी व अमरावती जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे. चांदूरबाजार तालुक्यातील तळेगाव मोहना आणि आसेगाव मंडळांतर्गत येणार्या गावांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले आहे. दोन्ही मंडळांत पर्जन्यमापक यंत्र बंद असल्याचे उघड झाले. या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.