अमरावती- 26 नोव्हेंबर निमित्ताने भारतभर 70 वा संविधान दिन साजरा करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. संविधान दिनाचे औचित्य साधून युवा विकास मंचच्यावतीने अमरावती जिल्ह्यात संविधानपर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
संविधान दिनानिमित्त 'युवा विकास मंच'च्यावतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन - संविधान दिन
संविधान दिनाचे औचित्य साधून युवा विकास मंचच्यावतीने अमरावती जिल्ह्यात संविधानपर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
युवा विकास मंच
हेही वाचा -राज्यात परत निवडणुका घ्याव्यात, आनंदराज आंबेडकरांची मागणी
या परीक्षेत एकाच वेळी 1 हजार 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच अमरावती जिल्ह्यतील इतर तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेत चांगले गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर स्पर्धा परिक्षेची मोफत पुस्तके तसेच मोफत कोचिंग देण्याचा निर्णय युवा विकास मंचच्यावतीने घेतला आहे.
Last Updated : Nov 26, 2019, 9:43 AM IST