महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Unseasonal Rain : अमरावतीत अवकाळी पाऊस, नागरिकांची तारांबळ; दीक्षांत समारोहाचा मंडपही कोसळला - अमरावती अवकाळी पाऊस

अमरावती शहरात बुधवारी दुपारी 4 वाजेच्या ( Unseasonal Rain ) दरम्यान वादळासह अवकाळी पाऊस बरसला. गत चार महिन्यांपासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना या पावसामुळे गारवा जाणवायला लागला आहे.

Amravati Unseasonal Rain
Amravati Unseasonal Rain

By

Published : May 25, 2022, 5:10 PM IST

अमरावती -अमरावती शहरात बुधवारी दुपारी 4 वाजेच्या ( Unseasonal Rain ) दरम्यान वादळासह अवकाळी पाऊस बरसला. गत चार महिन्यांपासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना या पावसामुळे गारवा जाणवायला लागला आहे. या वादळी पावसामुळे अनेक भागात नागरिकांची तारांबळ उडाली.

अवकाळी पाऊस

अचानक बदलले वातवरण -आज सकाळपासून कडक ऊन जणवत असताना दुपारी 3 वाजेच्या वातावरण अचानक पालटले. काळे ढ्गआकाशात दाटून आलेत आणि 4 वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस कोसळायला लागला. काही वेळेतच पावसासोबत जोरदार वादळ आले आणि अमरावतीकर काही वेळासाठी धासतावले.

लग्नसाह विविध कार्यक्रमात धावपळ -प्रचंड वाऱ्यासह जोरदार पाऊस पडायला लागल्यामुळे आज शहरात असणाऱ्या लग्न समारंभात धावपळ झाली. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळास्थळी उभारण्यात आलेला मांडवही हवेमुळे उडाला. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यवसायिकांचीही धावपळ झाली. अनेकांचे प्लास्टीकच्या कापडांचे छत उडून गेले. कॅम्प परिसर कठोरा नाका तसेच अकोली भागात काही ठिकाणी वादळामुळे वृक्षांची ही पडझड झाली आहे.

अवकाळी पावसाची आणखी शक्यता -वातावरणात आता झपाट्याने बदल होतो आहे. यामुळे येत्या एक-दोन दिवसात वादळी वाऱ्यासह असाच अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा -son of puri priest death : जगन्नाथ मंदिरासमोर पुजाऱ्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details