अमरावती -अमरावती जिल्ह्यात मेघाटातील पाच डोंगरी गावात दूषित पाणी पिल्यामुळे चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला ( Amravati Contaminated Water Case ) आहे. तसेच, एकूण 100 च्या वरती नागरिकांना कॉलराची लागण झाली. चार जणांचा मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे एकूण वीस लाख रुपयांची मदत पाठवली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आलेल्या या रकमेचा धनादेश खासदार नवनीत राणा यांनी चिखलदराचे प्रभारी तहसीलदार राजगडे यांना आज सुपूर्द केला ( CM Eknath Shinde Announced To Provide Rs 20 Lakh ) आहे.
खासदार नवनीत राणांनी मानले आभार -मेळाघाटातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ दखल घेतली. त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली. याबाबत खासदार नवनीत राणांनी ( MP Nanvneet Rana ) मुख्यमंत्री शिंदे आभार व्यक्त केले आहे. दहा वर्षात पहिल्यांदाच मेळघाटीतल समस्येची इतक्या तातडीने दखल घेण्यात आली असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
चार जणांचा झाला मृत्यू -मेघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या पाच डोंगरी आणि कोयलारी येथे दूषित पाण्यामुळे कॉलरा सारख्या आजारामुळे 100 च्यावरती नागरिक आजारी पडली. पाचडोंगरी येथील रहिवासी साबुलाल जामुनकर (76) सविता अखंडे (26), गंगाराम अधिकार (25 )आणि मुनिया उईके (65) या चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या ह्या चारही जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.