अमरावती -छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेला बुधभूषणम् हा ग्रंथ नव्या पिढीला माहिती व्हावा या उद्देशाने अमरावती शहरातील अजय लेंडे ( Ajay Lende Amravati ) या व्यक्तीने चक्क एक क्विंटल 24 किलो वजन असणारा बुधभूषणम् हा ग्रंथ ( Created Budhbhushanam Granth weighing 1 quintal 24 kg ) निर्माण केला आहे. नव्या पिढीला आपला इतिहास ठाऊक असावा, या उद्देशाने हा ग्रंथ नव्याने रचण्यात आल्याचे लेंडे सांगतात.
प्रतिक्रिया देताना ग्रंथ निर्माते असा आहे हा ग्रंथ :छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषणम् हा ग्रंथ अमरावतीच्या अजय लेंडे यांनी हस्तलिखित स्वरूपात निर्माण केला आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सचिन पवार या युवकाने 4089 पेन खर्च करून हा संपूर्ण ग्रंथ स्व अक्षरात लिहिला असून या ग्रंथाची रुंदी 3 फूट लांबी, 5 फूट आणि जाडी 11 इंच आहे. तर 134 पानांचा हा ग्रंथ एकूण 124 किलो वजनाचा आहे. या ग्रंथात करिता 78 मीटर कॅनवास आणि 18 मीटर सोलुशन वापरुन त्याचे बाइंडिंग करण्यात आली असल्याची माहिती अजय लेंडे यांनीही ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. या ग्रंथाकरिता शिवकालीन कागद दिल्ली येथून खास करून आणण्यात आले असून हा संपूर्ण ग्रंथ तयार करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला असल्याचे अजय लेंडे यांनी सांगितले आहे.
सिंदखेड राजा येथे ठेवणार ग्रंथ :पुढील200 पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळावे, या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. हा महाकाय ग्रंथ जिजामातेचे माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा येथे कायमस्वरूपी ठेवला जाणार आहे. या ग्रंथासाठी सिंदखेड राजा येथे विशेष असे दालन उभारल्या जात असल्याचेही अजय लेंडे यांनी सांगितले.
शनिवारी होणार प्रकाशन :अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे या भव्य ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित प्रकाशन सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, आमदार डॉक्टर पंकज भोयर, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिल्हाधिकारी पवणीत कौर, इतिहास तज्ज्ञ व विचारवंत डॉक्टर अशोक राणा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा -Mns Vs Shivsena : 'अटी शर्ती फक्त राज ठाकरेंसाठीच का?', मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन मनसेचा सवाल