अमरावती - कोल्हापूर आणि सांगली येथे पुरामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत म्हणून अमरावतीच्या छत्रपती ढोल ताशा मंडळाने कपडे, अन्न, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंसह पैसेही पाठवले आहेत.
पुरग्रस्तांसाठी अमरावतीतून मदतीचा हात, छत्रपती ढोल-ताशा पथकाचा पुढाकार
भाजपचे नगरसेवक प्रणित सोनी हे छत्रपती ढोल-ताशा पथकाचे संचालक आहेत. सोनी यांच्या पुढाकाराने पथकतील सर्व मंडळींनी कपडे, औषधी, दैनंदिन गरजेच्या वस्तू, धान्य जमा करून पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला.
भाजपचे नगरसेवक प्रणित सोनी हे छत्रपती ढोल-ताशा पथकाचे संचालक आहेत. सोनी यांच्या पुढाकाराने पथकतील सर्व मंडळींनी कपडे, औषधी, दैनंदिन गरजेच्या वस्तू, धान्य जमा करून पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. प्रणित सोनी यांच्यासह राहुल ढवळी, सुमित बंड, उमेश पांडे, सौरभ राऊत, भूषण हरकूट, शशांक जोशी, अजिंक्य देशमुख, यश टप्पे, अनुराग पाटील, भावेश सोनी,अक्षय वानखडे, भारत धानोरकर आदींनी मदत गोळा करण्यास पुढाकार घेतला. जिल्ह्यातील सर्व मोठ्या ढोल-ताशा पथकांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रणित सोनी यांनी केले.