अमरावती - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान अधिकृत दारू विक्री दुकाने बंद आहेत. त्यामुळे सध्या गावठी दारूकडे मद्यपींचा कल वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पोलिसांकडून अशा दारू अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी चांदूर रेल्वे पोलिसांनी पहिल्यांदाच ड्रोन कॅमेराची मदत घेत, सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
जंगलातील गावठी दारूच्या अड्ड्यांवर आता 'ड्रोन'ची नजर.. चांदूर रेल्वे पोलिसांचा उपक्रम हेही वाचा...मजुरांची पोलिसांवर दगडफेक... गुजरातच्या दोहोडमधील प्रकार
पोलिसांच्या नजरेला चुकवत जंगल भागात मोठ्या प्रमाणात दारूभट्ट्या सुरू असल्याचे चांदुर रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी जंगलातील गावठी दारूच्या भट्या शोधण्यासाठी चक्क ड्रोन कॅमेराची मदत घेतली. शनिवारी पहिल्याच दिवशी पोलिसांनी गौरखेडा शेत शिवारात केलेल्या कारवाईत तब्बल 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारू तस्करांवर सतत होणाऱ्या कारवायांमुळे दारू बनवणारेदेखील हुशार होत आहेत. त्यांनी आता दाट जंगलात दारू अड्डे बनवले आहेत. मात्र, यावरही आता पोलिसांनी जालिम उपाय शोधला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्यामुसार ड्रोन कॅमेरा संशयीत भागात नेऊन त्याआधारे दारू अड्डे शोधले. त्यावेळी गौरखेडा येथे अनेक ठिकाणचे दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.