महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीच्या गौरखेडामध्ये अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा - चांदूर रेल्वे पोलीस

अमरावतीच्या गौरखेडामध्ये अवैधरित्या दारू बनवणाऱ्या गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. चांदूर रेल्वे पोलिसांची केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Chandur Police amaravti
अमरावतीच्या गौरखेडामध्ये अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड

By

Published : Apr 5, 2020, 9:59 AM IST

अमरावती -राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. त्यामुळे आता गावठी दारू बनवण्याचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात पोलिसांनी अशा अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईचा सपाटा सुरू आहे. शनिवारी सकाळी चांदूर रेल्वे पोलिसांनी तालुक्यातील गौरखेडा येथे दोन ठिकाणच्या गावठी अड्ड्यावर धाड टाकुन ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अमरावतीच्या गौरखेडामध्ये अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड

हेही वाचा...तबलिगी मरकझ: लातुरात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' 12 पैकी 8 जणांचा अहवाल 'पाॅझिटिव्ह'

चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौरखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जात होती. ही माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून एकुण ६४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दारू बनवण्यासाठी वापरणारे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच पोलिसांनी राहुल सुभाष पवार (२४) व राजेश्री सनोज पवार (२४) दोघेही राहणार गौरखेडा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही फरार आहेत. ही कारवाई पोलीस निरिक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या एकूण पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details